विशाल पुजारी
तुमच्या अकांऊटचे पैसे रिकामे होऊ नयेत असं वाटत असेल तर, तुम्ही लक्षपूर्वक काय घडलंय ते जाणून घ्या. ही घटना कोल्हापुरातली राधानगरी तालुक्यातली आहे. पै पै करुन एका शेतकरी दाम्पत्याने बँकेत पैसे साठवले होते. या पैशातून शेतीला जोड म्हणून आपल्या दुभत्या जनावरात भर घालण्यासाठी त्यांनी म्हशी घ्यायचा विचार केला होता. त्यासाठी बँकेतले पैसे वापरावेत या विचारांने त्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण, अकाऊंटला केवळ 2 लाखचं शिल्लक होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूरच्या घटनेतील शेतकरी कुटुंबांन आपलं घर चालवण्यासाठी काही रक्कम बँकेत जमा करून ठेवलेली होती. काही दिवसातच हे शेतकरी दाम्पत्य एक म्हैस खरेदी करणार होतं. यासाठी बँकेत सात लाख रुपये आत्तापर्यंत साठवून ठेवलेले होते. हीच रक्कम दाम्पत्याच्या मुलाने ऑनलाईन गेम खेळून संपवली. या मुलाच्या आई वडिलांना ज्यावेळेस बँकेतील पैसे गायब असल्याचं समजलं तेव्हा त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली. सायबर पोलिसांनी या सगळ्या घटनेचा तपास सुरू केला. यावेळी या शेतकरी कुटुंबातील मुलाने फ्री फायर नावाच्या गेममध्ये पैसे घालवले असं निष्पन्न झालं.
बँक स्टेटमेंट काढल्यावर पैसे ऑनलाईन काढल्याचं समजलं. पण, कोणताच मोठा आर्थिक व्यवहार न करणाऱ्या या ग्रामीण भागातील कुटुंबाला इतक्या मोठ्या फसवणुकीचा अंदाजचं नव्हता. बँकेने पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. हताश झालेल्या शेतकऱ्याने सायबर पोलीस ठाणं गाठलं. पोलिसांनीही तात्काळ तपास सुरू केला. शेतकऱ्यांच्या मोबाईलमधले मेसेज तपासले गेले. तर, त्यात काहीच आढळलं नाही. मग, पोलिसांनी बँक स्टेटमेंटमधील ट्रान्झेक्शन आयडीच्या आधारे तपास केला.
त्यावेळी 5 लाखाची रक्कम ‘फ्री फायर' गेममधील व्हर्च्युअल वेपन्स खरेदीसाठी वापरल्याचं दिसलं. या शेतकऱ्याचा सहावीतला मुलगा मोबाईलवर गेम खेळायचा. मोबाईल नंबर बॅक अकाऊंटला लिंक होता. त्याने मोबाईलवर ‘फ्री फायर' गेम खेळतांना नकळत काही एँप्लिकेशन घेतले. ज्यामुळे 5 लाख रुपये उडाले. यापैकी बरीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी छुप्या अॅपद्वारे मोबाइलचा ताबा घेऊन विविध खात्यांवर वळविली. त्यामुळे हा सायबर गुन्हा समोर आला असला तरी ही रक्कम पुन्हा मिळवणं कठीण आहे.
'फ्री फायर'मुळे अकाऊंट रिकामं होतं कसं? मोबाईलमध्ये डाउनलोड केलेली गेमिंग एप्लीकेशन सगळा डेटा ॲक्सेस करतं.
फ्री फायर सारखे गेम बँक अकाउंट जोडले जातात. गेमिंगमध्ये वेगवेगळ्या लेव्हलला व्हर्च्युअल वेपन्स खरेदी केली जातात. व्हर्च्युअल वेपन्सची किंमत 10 ते 20 हजार असते. प्रत्येक टप्पात वेपनच्या किंमतीत वाढ होत जाते. अशा प्रकारे ही ऑनलाईन गेमिंच्या माध्यमातून फसवणूक केली जाते असं सायबर तज्ज्ञ अजय सावंत यांनी सांगितलं. सहावीत शिकणाऱ्या या मुलाला कोणत्याचं गोष्टीची कल्पना नव्हती. त्यामुळे तो प्रत्येक टप्प्यात नकळत अशी वेपन खरेदी करत राहीला. मोबाईल गेममुळे नुकसान झाल्याची ही पहिलीच घटना नाही. तरीही बरेच पालक आपल्या लहान मुलांना मोबाईलचा सर्रासपणे वापर करु देतात. पण, मुलं नेमकं मोबाईलमध्ये काय पाहतात, काय खेळतात यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर काय होतं त्याचं हे जिवंत उदाहरण आहे.