जाहिरात

Maharashtra Assembly Session 2025: झिरवळांनी शिवसेनेच्या आमदाराला बनवलं 'मंत्री', विधानसभेत नेमकं काय घडलं?

Maharashtra Assembly Session 2025: बाजारपेठेत भेसळयक्तु तेलाची विक्री होत असल्याबाबत अक्कलकुवाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी विधानसभात प्रश्न उपस्थितत केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नरहरी झिरवाळ उत्तर देत होते.

Maharashtra Assembly Session 2025: झिरवळांनी शिवसेनेच्या आमदाराला बनवलं 'मंत्री', विधानसभेत नेमकं काय घडलं?

Maharashtra Assembly Session 2025: विधानसभेच्या कामकाजादरम्यान अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर प्रश्नोत्तर सत्रादरम्यान सॉरी बोलण्याची वेळ आली. शिवसेनेच्या आमदाराला मंत्री संबोधल्याने नरहरी झिरवाळ यांना सॉरी बोलावं लागलं.  मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यानंतर मिश्किल वक्तव्य करत वातावरण हलकं केलं.

सभागृहात नेमकं काय झालं?

बाजारपेठेत भेसळयक्तु तेलाची विक्री होत असल्याबाबत अक्कलकुवाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांनी विधानसभात प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नरहरी झिरवाळ उठले. मात्र गडबडीत झिरवाळ यांनी आमसा पाडवी यांचा मंत्रिमहोदय असा उल्लेख केला. 

नरहरी झिरवाळ यांनी आमदार महोदय यांनी प्रश्न विचारला म्हणण्याच्या ऐवजी मंत्रिमहोदय यांनी प्रश्न विचारला, असा उल्लेख केला. मात्र इतर सदस्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मात्र नंतर पुन्हा तीच चूक केली. यावेळी झिरवाळ यावेळी काहीसे गोंधळलेले दिसले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सारवासारव करत "त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ लागेल" अशी  कोपरखळी देखील लगावली. त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com