विशाल पुजारी, कोल्हापूर:
Kolhapur ACB Raid News: कोल्हापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सर्वात मोठी कारवाई केली आहे, ज्याची सध्या जिल्ह्यात चर्चा होत आहे. एटीएसच्या पथकाने दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला रंगेहाथ पकडले. बाळूमामाचे भक्त बनून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. प्रदीप देसाई असे या लाचखोर अभियंत्याचे नावे आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरमध्ये एसीबीची मोठी कारवाई...!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुरच्या हुपरी नगरपरिषदेमध्ये दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. हुपरी नगरपरिषदेंतर्गत केलेल्या कामांचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याचे आमिष मुरगूड नगरपरिषदेतील अभियंत्याने दिले होते. ठेकेदाराचे एमबी रजिस्टर देसाई यांनी बदली झाल्यानंतर सोबत आणले आहे. ते पूर्ण करावे, यासाठी या ठेकेदाराने देसाई यांना विनंती केली होती. पण त्यांनी यासाठी दीड लाखांची मागणी केली.
तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये स्वीकारताना मुरगूड एसटी स्टॅण्डवर आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. मुरगूड नगरपरिषदेची इमारत एसटी स्टॅण्डला लागूनच आहे. तक्रारदाराने सव्वापाचच्या सुमारास देसाई यांना ४० हजार घेऊन आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर देसाई स्टॅण्डवर आला. त्याने आपल्या गाडीचे दार उघडले त्यावेळी तक्रारदाराने आणलेली रक्कम गाडीत ठेवली. त्याचवेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून रक्कम ताब्यात घेतले.
Crime News: नालासोपाऱ्यात 'व्हेल माशाची उलटी' जप्त; किंमत ऐकून थक्क व्हाल! दोघांना अटक
मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बाळूमामाचे भाविक बनून येत ही कारवाई केली. मुरगूडच्या एसटी स्टॅण्डवर मोठी गर्दी होती. सापळा लावला आहे याची जाणीव आरोपीला होऊ नये, यासाठी गुप्तता पाळण्यात आली होती. सर्व कर्मचारी साध्या गणवेशात होते. शिवाय सर्वांनी बाळूमामांचे दर्शन घेणारे भाविक वाटावे, यासाठी कपाळ भरून भंडारा लावला होता. त्यामुळे स्टॅण्डपर्यंत चालत येताना देसाई याला कोणताच संशय आला नाही आणि तो जाळ्यात अडकला.
बाळूमामाचे भक्त बनून रंगेहाथ पकडलं
एकूण एक लाख तीस हजारांची लाच या अभियंत्याने माहितली होती. त्यापैकी चाळीच हजाराचा पहिला हप्ता दिला जाईल, असं ठरवण्यात आले.ठरल्यानुसार, एक लाख तीस हजारपैकी पहिल्या हप्ताची रक्कम चाळीस हजार रुपयांची बॅग तक्रारदाराने देसाई यांच्याकडे दिली. ही रक्कम गाडीत ठेवल्यानंतर लगेचच पोलिसांनी छापा टाकून देसाई याला ताब्यात घेतले. याप्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करत आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली.
(नक्की वाचा- BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?)