जाहिरात

Crime News: नालासोपाऱ्यात 'व्हेल माशाची उलटी' जप्त; किंमत ऐकून थक्क व्हाल! दोघांना अटक

Nalasopara Crime News: सुमारे 1 कोटी 85 लाख 80 हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. उलटीचं वजन सुमारे 1 किलो 858 ग्रॅम आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News: नालासोपाऱ्यात 'व्हेल माशाची उलटी' जप्त; किंमत ऐकून थक्क व्हाल! दोघांना अटक

Nalasopara Crime News: नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रतिबंधित अशा व्हेल माशाच्या उलटीची तस्करी रोखण्यात मोठे यश मिळवले आहे. तुळींज पोलिसांनी एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. सुमारे 1 कोटी 85 लाख 80 हजार रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. उलटीचं वजन सुमारे 1 किलो 858 ग्रॅम आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.

अशी झाली कारवाई

तुळींज पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, 90 फिट रोड, प्रगतीनगर येथे प्रतिबंधित वस्तूची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या कादर गफार करगना याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्याच्याकडे असलेल्या बॅगेत पोलिसांना तपकिरी रंगाचा मेणासारखा पदार्थ आढळला, जो तपासात व्हेल माशाची उलटी असल्याचे निष्पन्न झाले.

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)

तपासात मोठे धागेदोरे

कादर गफार याची कसून चौकशी केली असता, ही उलटी त्याला किशोर महादेव तपसाळे याने दिल्याचे समोर आले. पोलिसांनी त्वरित हालचाली करत किशोरलाही बेड्या ठोकल्या आहेत. या दोघांनी ही उलटी कुठून आणली आणि ते कोणाला विकणार होते, याचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

(नक्की वाचा-  BMC Election : मुंबईत अमराठी नगरसेवकांची संख्या वाढली; सर्वाधिक भाजपचे, गुजराती किती?)

व्हेल माशाची उलटी इतकी महाग का असते?

व्हेल माशाच्या उलटीला 'समुद्रातील तरंगते सोने' म्हटले जाते. याचा वापर प्रामुख्याने महागड्या परफ्यूममध्ये (सुगंध टिकवण्यासाठी) आणि काही औषधांमध्ये केला जातो. भारतात वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत याची विक्री आणि तस्करी करणे हा गंभीर गुन्हा आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com