विशाल पुजारी
ऑनलाईन रम्मीमध्ये अनेक जण देशोधडली लागले याची अनेक उदाहरणे ताजी आहेत. ऑनलाईन रम्मी खेळू नका असे आवाहन वारंवार केले जाते. पण त्याकडे रम्मीच्या आहारी केलेल दुर्लक्ष करतात. त्यातून त्यांच्या हातून भयंकर गुन्हे ही होतात. ते इतके भयंकर असतात की त्यातून ते बाहेर येवू शकत नाही अशी स्थिती निर्माण होते. अशीच एक घटना कोल्हापूरात घडल्याचे समोर आले आहे. रम्मीच्या नादात कर्ज बाजारी झालेल्या दोघा मित्रांनी कोल्हापुरात एक भयंकर कांड केला आहे. त्यामुळे सर्वच जण हादरून गेले आहेत.
ऑनलाईन रम्मीत पैशाची उधळण केल्याने कर्जबाजारी झाल्याने दोघा मित्रांनी दागिने चोरण्याचा कट केला होता. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील पणोरे गावात मारुती पाटील आणि कपिल पातळे ही दोघं बालपणासूनचे मित्र आहेत. या दोघांना ही ऑनलाइन रम्मी खेळण्याचे व्यसन लागले होते. हे व्यसन इतके टोकाला गेले होती की त्यांनी त्यात अक्षरश: पैशाची उधळण केली होती. ते कर्जबाजारी झाले. दोघांवर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं.
त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी या मित्रांनी एक कट रचला. हा कट होता दागिने चोरी करण्याचा. त्यासाठी त्यांनी गावातील सर्वात श्रीमंत महिलेची निवड केली. तीचे वय ही 73 वर्ष होते. त्याचं नाव श्रीमंती रेवडेकर असं होतं. चोरी कधी करायची याचा दिवसही ठरला. अनंत चतुर्थी दिवशी गावात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. त्यामुळे रेवडेकर या घरात एकट्याच होत्या. ही संधी त्यांनी साधली. त्यांच्या अंगावरील दागिन्यांवर त्यांनी डल्ला मारला. परंतु रेवडेकर यांनी प्रतिकार त्यांना जोरदार प्रतिकार केला.
आता आपण पकडले जाणार अशी भिती त्यांना वाटली. त्याच वेळी त्यांनी त्यांच्या डोक्यात वार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह त्यांनी गोबर गॅसमध्ये टाकून दागिने घेवून त्यांनी पलायन केलं. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस आणि राधानगरी पोलीसांनी समांतर तपास सुरू केला. दरम्यान या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपीनीय माहितीनुसार पोलिसांनी गावातीलच अभिजित पाटील आणि कपिल पातळे यांना अटक केली. त्यानंतर पोलीस चौकशीत या दोघांनी रेवडेकर यांच्या खूनाची कबुली दिली.