
सौरभ वाघमारे, प्रतिनिधी
Govind Barge Death : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे हत्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. गोविंद बर्गे यांनी कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्या प्रेमातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असताना कुटुंबीयांच्या आरोपानंतर प्रकरणात नवा ट्विस्ट (Govind Barge Suicide or Murder) आला आहे.
गोविंद बर्गे यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांकडून केला जात आहे. जी व्यक्ती आयुष्यात कधी काठी सोबत ठेवू शकत नाही ती बंदूक कशी सोबत ठेवेल असा सवाल गोविंद बर्गे (EX deputy Govind Barge) यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या सरपंचांना वैराग पोलिसांचा फोन आला होता.

गोविंद बर्गे यांचा या कारमध्ये मृतदेह सापडला
त्यांनी गोविंद बर्गेंच्या हत्येची माहिती दिली होती. यानंतर नातेवाईकांनी त्वरित वैराग येथील सासुरे गावात धाव घेतली. आम्ही गेल्यानंतर पाहिलं तेव्हा गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरली होती. गोविंद बर्गे यांच्याकडे बंदुक नव्हती, त्यामुळे ही बंदुक आली कुठून असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा - Beed Crime News:कला केंद्र, नाच, iphone, पैसा अन्..बीडच्या विवाहित माजी उपसरपंचाची 'ती' च्या घरासमोर आत्महत्या
पूजा गायकवाडवर कुटुंबीयांचा निशाणा
कला केंद्रात नाचणारी पूजा गायकवाड या नर्तिकेने गोविंद बर्गे यांना लुबाडलं आहे. त्यांच्याकडून पैसे, महागडा मोबाइल घेतला आहे. या पैशातून नातेवाईकांसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप बर्गेंच्या नातेवाईकांकडून केला जात आहे. गेवराईतील घर नावावर करण्यासाठी ती गोविंद यांना ब्लॅकमेल करीत होती. म्हणून गोविंद यांना तिच्या गावी बोलावून घातपात केला. ही आत्महत्या नाही, हा घातपात आहे असा आरोप गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world