Kolkata Doctor Murder : पत्नीला मारलं, मुलाला गमवालं... सासूनं वाचला मुख्य आरोपीच्या पापांचा पाढा

Kolkata Doctor Murder : कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉयच्या स्वभावाबाबत त्याच्या सासूनं महत्त्वाची माहिती दिली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

कोलकातामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयच्या (Kolkata Rape And Murder Accused Sanjay Roy)  पाशवीपणाचे रोज नवे किस्से उघड होत आहेत. पोलिसांच्या तपासातून त्याची संपूर्ण कुंडली समोर आलीय. त्यापाठोपाठ आता त्याच्या सासूनंच NDTV शी बोलताना आरोपीच्या पापाचा पाढा वाचला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

संजयनं 19 फेब्रुवारी 2022 रोजी लग्न केलं. संजयनं पत्नीसोबत लग्नाच्या दिवशी सात प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पण, त्यावेळी दिलेली सात वचनं त्यानं पाळली नाहीत. संजय निर्दोष असल्याचा दावा त्याची आई करतीय. पण, त्याचवेळी सासूनं त्याचा खरा स्वभाव कसा आहे हे सांगितलं आहे. 

संजयला बायकोला मारहाण करण्याची तसंच तिच्यासोबत गैरवर्तन करण्याची सवय होती. लग्नानंतर काही दिवसांनीच त्यानं बायकोला त्रास देण्यास सुरुवात केली. लग्नानंतर काही दिवसांनीच त्याच्या पत्नीला कॅन्सर झाला. या आजारातच 10 मे 2023 रोजी तिचा मृत्यू झाला. संजयची पत्नी मृत्यूच्या वेळी 3 महिन्यांची गर्भवती होती. संजयनं त्याच्या गैरवर्तनामुळे फक्त बायकोच नाही तर मुलाला देखील गमावलं. 

( नक्की वाचा : Kolkata Doctor Murder : काय होतं पीडित डॉक्टरचं स्वप्न? कसं हवं होतं आयुष्य? डायरीमधून झाला उलगडा )
 

संजय रॉयच्या सासूनं एनडीटीव्हीला सांगितलं की, 'संजय लग्नानंतर काही दिवसांमध्येच दारु पिऊ लागला. तो मुलीला मारहाण करत होता. तो लग्नानंतर कधी-कधी सासुरवाडीत येत असे. संजय रॉयचं हे दुसरं लग्न होतं. त्याची पहिली बायको त्याला सोडून निघून गेली.' संजयची आई आणि बहिणीनंही त्यानं एकपेक्षा जास्त लग्न केल्याचं मान्य केलं आहे. 

Advertisement

( VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं? )
 

एकटा गुन्हेगार शक्य नाही

संजय रॉय या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यानं त्याचा गुन्हा मान्यही केलाय. पण, तो एकटा इतका मोठा गुन्हा करु शकत नाही, असा अंदाज त्याच्या सासूनं व्यक्त केलाय. त्याच्याबरोबर अन्य लोकंही सहभागी असतील, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय. ही घटना घडली तेव्हा संजयसोबत कोण-कोण होतं याचा सीबीआय सध्या तपास करत आहे. त्याची पॉलीग्राफ टेस्ट होणार आहे. त्यानंतर या प्रकरणातील अनेक रहस्य बाहेर येऊ शकतात.