Sunita Jamgade Nagpur : LOC ओलांडण्याचा सीन रिक्रिएट करणार, सुनीताला नेण्यासाठी लडाख पोलिसांची टीम नागपुरात

सध्यातरी सुनीता जामगडे चौकशीत फारसे सहकार्य करत नसून तपासात कुठलाही मुद्दा सुटू नये यासाठी तिला LOC वर नेल्यास ती स्पष्ट सांगू शकेल, अशी लडाख पोलिसांची भावना आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, प्रतिनिधी

पाकिस्तानात गेलेल्या नागपुरच्या सुनीता जामगडे हिला चौकशीसाठी कारगिलला घेऊन जाण्यासाठी लडाख पोलिसांची टीम नागपुरात दाखल झाली आहे. लडाख पोलिसांची टीम सुनीता जामगडेच्या प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरच्या सत्र न्यायालयाची अनुमती मागणार असल्याचंही सांगितलं जात आहे. यावेळी सुनीताने नियंत्रण रेषा ओलांडण्याचा सीन रिक्रिएट केला जाणार आहे. याशिवाय तिला कारगिलजवळील एलओसीवर नेण्यात येऊन विचारपूसही केली जाणार आहे. सुनीला पाकिस्तानात कशी आणि कोणत्या मार्गाने गेली याचा देखील लडाख पोलिसांकडून तपास केला जाणार आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 
सध्यातरी सुनीता जामगडे चौकशीत फारसे सहकार्य करत नसून तपासात कुठलाही मुद्दा सुटू नये यासाठी तिला LOC वर नेल्यास ती स्पष्ट सांगू शकेल, अशी लडाख पोलिसांची भावना आहे. सध्या सुनीता जामगडे मध्यवर्ती कारागृहात असून तिच्या मोबाईलचा फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल आल्यावर तिला पुन्हा नागपूर पोलिसांकडून पुढील चौकशी करिता पोलीस कोठडीत घेता येईल.

Advertisement

नक्की वाचा - EXPLAINER : डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? कोट्यवधींची फसवणूक कशी होते? वाचा सविस्तर

सुनीता नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात कशी गेली? 

  • ऑपरेशन सिंदूर सुरू असताना आणि सीमेवर सैन्य सज्ज असताना सुनीता पाकिस्तानात कशी जाऊ शकली यावर अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. यामागे आणखी कोणाचा हात आहे का? नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी कोणती टीम सक्रीय आहे का याचाही तपास लडाख पोलिसांकडून घेतला जाणार आहे.
  • सुनीताच्या म्हणण्यानुसार, तिने गुगल मॅप्स नेव्हिगेशन टूल्सचा वापर करून LOC ओलांडली. मात्र, कारगिल येथील लडाख पोलिसांच्या पथकाला तिचे यावर संपूर्ण उत्तर हवे आहे.
  • दुसरीकडे नागपूर पोलिसांनी सुनीताचा मोबाईल फोन मोबाईल फॉरेन्सिक टेस्टिंग करिता पाठवला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर नागपूर पोलीस तिचा पीसीआर मागू शकतात.
  • तिच्या मोबाईल फोन मध्ये संशयास्पद अॅप आढळल्याची माहिती आहे. हा अॅप कुणी इंन्स्टॉल केला, का केला या विषयी सुनीताने ठोस माहिती अद्याप दिलेली नाही.
  • पोलिसांना या अॅप विषयी अधिक माहिती नसल्याने त्याला अद्याप उघडण्यात आलेले नसल्याचे पोलीस सूत्रांनी NDTV मराठीला सांगितले.
  • फॉरेन्सिक तपासणी दरम्यान हे देखील पाहिले जाणार आहे की, सुनीताच्या मोबाइल फोनमध्ये एखादे नवीन चिप बसविण्यात आले आहे काय?
  • या आणि अशा कित्येक मुद्द्यांची देखील छाननी केली जाणार आहे.
  • फॉरेन्सिक टेस्टिंगनंतर न्याय वैद्यक शास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर नागपूर पोलीस पुन्हा तिची पोलीस कोठडी मागू शकते.