Mumbai News : 80 सेकंदात 5 किलोमीटर; सी-लिंकवर मृत्यूचा खेळ; 250 किमीच्या गतीने धावली लँबर्गिनी, भयंकर Video

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर भयंकर ड्रायव्हिंगचा व्हिडिओ समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबई के बांद्रा-वर्ली सी लिंक पर एक लैंबर्गिनी कार को 250 KM प्रति घंटे की रफ्तार से चलाते हुए पकड़ा गया
  • पुलिस ने चालक फैज एडनवाला की पहचान की जो खार पश्चिम का निवासी है और कार डीलर बताया गया है
  • कार अहमदाबाद निवासी नीरव पटेल की है और हरियाणा रजिस्ट्रेशन नंबर HR 70 F 1945 पर पंजीकृत है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर भयंकर ड्रायव्हिंगचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणात वरळी पोलिसांनी पिवळ्या रंगाच्या लँबर्गिनी कार जप्त केली आहे. ही कार वांद्रे वरळी सी लिंकवरुन २५० किलोमीटर प्रति तास वेगाने चालवली जात होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. इतक्या वेगाने गाडी चालवणे अत्यंत धोकादायक आहे. 

२५० च्या स्पीडने पळवली लँबर्गिनी...

पोलीस तपासानुसार, हा चालक ३६ वर्षांचा असून त्याचं नाव फैज एडनवाला आहे. तो खार पश्चिमेला राहतो. फैज एक कार डिलर असल्याचं सांगितलं जात आहे. तर गाडीचा मूळ मालक अहमदाबाद येथील राहणारा असून त्याचं नाव नीरव पटेल आहे. त्याने आपली कार काही काळासाठी फैजला दिली होती. लँबर्गिनी ही अत्यंत महागड्या कारपैकी एक आहे, जप्त केलेल्या कारवर हरयाणाचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. ही कार मुंबईत चालवली जात होती. 

वरळी सी-लिंक ५.६ किलोमीटर इतका लांब आहे. तर लँबर्गिनीचा स्पीड २५० प्रतितास होता. याचा अर्थ या कारला वरळी सी-लिंक पार करण्यासाठी अवघ्ये ८० ते ९० सेकंद लागले असतील. (AI ने दिलेल्या माहितीनुसार) पाच किलोमीटरहून अधिक अंतर केवळ ८० सेकंदात पार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Mira-Bhayander : आरोपीच्या शोधात सापडलं मोठं घबाड; पोलिसांची दुसऱ्या राज्यात धाड, 100 कोटींचा मुद्देमाल जप्त 

​​​​​​​

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सी-लिंकवर या धोकादायक ड्रायव्हिंगचा व्हिडिओ समोर आल्यानंतर गाडीचा शोध घेत चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. निष्काळजीपणा आणि धोकादायक पद्धतीने कार चालविण्याच्या आरोपाखाली फैजविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणं हे केवळ कायद्याचं उल्लंघन करणारं नाही, तर जीवघेणंही होऊ शकतं. सी-लिंकवर स्पीड लिमिट ८० किलोमीटर प्रतितास आहे. आरोपीने कायद्याचा भंग केला आहे. त्याच्याविरोधात कारवाई केली जात आहे.  

Topics mentioned in this article