Latur News: शिक्षकाचे 'ते'भयंकर कृत्य, विद्यार्थ्यांमध्ये भिती, पालक चिंतेत, एकाच वेळी 30 विद्यार्थ्यांसोबत...

शाळेच्या प्राचार्य जेबा नाडेर यांनी सांगितले की आम्ही शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • लातूरमधील क्रिस्ट इंटरनॅशनल शाळेत शिक्षकाने रागाच्या भरात ३० ते ३२ विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली
  • शिक्षक उज्ज्वल सोनीने दुचाकीची नंबर प्लेट वाकडी असल्याने विद्यार्थ्यांना मारहाण करत जाब विचारला
  • शाळेच्या प्राचार्य जेबा नाडेर यांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला निलंबित केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
लातूर:

त्रिशरण मोहगावकर 

शिक्षक आणि विद्यार्थी याच्यातलं नातं हे गुरू शिष्याचं नातं असतं. पण या नात्याला बट्टा लावण्याचा प्रकार लातूरमध्ये घडला आहे. इथं शिक्षकाने रागाच्या भरात विद्यार्थ्यांसोबतच नको ते कृत्य केले आहे. त्याने सगळेच जण हादरले आहेत. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये ही भितीचे वातावरण आहे. शाळा प्रशासनाच्या ही हा प्रकार लक्षात आल्यानंतर ते ही चिंतेत आहेत. पालकांचा तर हा प्रकार समोर आल्यानंतर पारा चढला आहे. त्यांनी शाळा प्रशासनाला झालेल्या कृती बद्दल जाब विचारला आहे. शिवाय कडक पावलं उचलण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनावरही दबाव वाढला आहे. 

लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर पासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर क्रिस्ट इंटरनॅशनल शाळा आहे. या शाळेत शिकणाऱ्या 30-32 विद्यार्थ्यांना शिक्षकाने जबर मारहाण केली. ही मारहाण इतकी जबर होती की त्यांच्या अंगावर काळे निळे डाग पडले. गुराढोरांना मारावे अशा पद्धतीने त्यांना मारण्यात आलं होतं. त्यामागचं कारण ऐकून तुम्ही ही डोक्याला हात मारून घ्याला. उज्ज्वल सोनी असं या शिक्षकाचे नाव आहे. त्यांचा क्लास झाल्यानंतर काही विद्यार्थी हॉस्टेलच्या दिशेने जात होते. 

Advertisement

नक्की वाचा - Pune Bhigwan: 'सुट्टीच्या दिवशी प्रतिज्ञापत्र कसं बनवलं?', भिगवण प्रकरणात एक नाही तर अनेक प्रश्न?

तिथेच त्यांची दुचाकी पार्क केली होती. त्यांनी दुचाकी पाहीली असता नंबर प्लेट वाकडी झाली होती. शिवाय गाडी ही सुरू होत नव्हती. याचा जाब त्यांनी तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना विचारला. त्यांनी रागाच्या भरात तिथे असलेल्या 30 ते 32 मुलांना जबर मारहाण करायला सुरूवात केली. गाडीसोबत काय केले सांगा अशी विचारणा ते विद्यार्थ्यांना करत होते. सोबत त्यांची धुलाई ही करत होते. ही माहिती प्राचार्या जेबा नाडेर यांना समजली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. शिवाय शिक्षकाला मारहाण करण्यापासून रोखले. शिवाय जखमी विद्यार्थ्यांना प्रथमोपचार देण्यात आला. 

नक्की वाचा - Virar News: साप पकडला, गळ्यात घातला, स्टंट करण्याच्या नादात जीव गेला, अंगावर काटा आणणारा Video

शाळेच्या प्राचार्य जेबा नाडेर यांनी सांगितले की आम्ही शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याला पोलीसांच्या स्वाधिन ही केले आहे. त्याच बरोबर शाळा प्रशासनाने त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित केले आहे. अशी माहिती प्राचार्या नाडेर यांनी दिली आहे. तर पालकांनी झालेल्या प्रकाराबाबत आम्हाला कोणती ही माहिती देण्यात आली नव्हती. आम्हाला अंधारात ठेवण्यात आले असा आरोप केला आहे. जेव्हा आम्ही हॉस्टेलमध्ये फोन केले तेव्हा तासभर ते कुणीच उचलले नाहीत असा ही आरोप करण्यात आला आहे. संबंधीत शिक्षकावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.