Akola News: नाशिक, अमरावतीनंतर आता अकोल्यात खळबळ; गेमिंग ॲपवरून ओळख, मग हिंदू तरुणीचं अपहरण

Love Jihad Allegations in Akola: राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांमध्ये समोर येत असलेल्या वादाच्या घटनांनंतर आता अकोला शहर एका खळबळजनक प्रकरणाने हादरले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Love Jihad Allegations in Akola: आरोपीने या तरुणीला स्वतःच्या घरात 5 दिवस डांबून ठेवले होते.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Love Jihad Allegations in Akola: राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध शहरांमध्ये समोर येत असलेल्या वादाच्या घटनांनंतर आता अकोला शहर एका खळबळजनक प्रकरणाने हादरले आहे. नाशिक आणि अमरावतीमधील घटनांच्या पाठोपाठही अकोल्यातही प्रेमाच्या नावाखाली एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तिला डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच शहरात मोठी खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी संघटनांनी याला 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचे सांगत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, या प्रकरणातील संशयित तरुण हा आधीच विवाहित असून त्याला एक मूल देखील आहे. त्याने गेमिंग ॲपवर स्वतःची खोटी ओळख निर्माण केली होती. 'बादशाह' या युजरनेमने बनावट अकाउंट चालवून तो अनेक तरुणींशी संपर्क साधत असे. याच माध्यमातून त्याने हरियाणा राज्यातील एका हिंदू तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. तरुणीच्या घरातील वादाचा फायदा घेत त्याने तिचे ब्रेनवॉश केले आणि तिला फूस लावून अकोल्यात आणले.

Advertisement

( नक्की वाचा : Akola News: अकोल्यातल्या मजुराची मुलगी बनली सरकारी अधिकारी, कोणत्याही ट्युशनशिवाय झाली 3 परीक्षा पास! )
 

आरोपीने या तरुणीला अकोल्यातील गीता नगर भागात असलेल्या स्वतःच्या घरात 5 दिवस डांबून ठेवले होते. दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी हरियाणा पोलिसात ती बेपत्ता झाल्याची आणि तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. मुलीचा शोध घेत असतानाच तिचा भाऊ अकोल्यात पोहोचला. त्याने स्थानिक खदान पोलिसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. पोलिसांनी तातडीने हालचाली करत संबंधित घरातून तरुणीची सुटका केली आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतले.

विश्व हिंदू परिषद आक्रमक

ही घटना समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खदान पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. संशयित आरोपीने आपली ओळख लपवून आणि विवाहित असतानाही हिंदू मुलीला जाळ्यात ओढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला. हा संपूर्ण प्रकार 'लव्ह जिहाद' असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. या प्रसंगामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती हाताळली.

( नक्की वाचा : Nashik News: नाशिकच्या मुलीला मलेशियात पाठवण्याचा होता डाव; TCS धर्मांतर प्रकरणात 'मालेगाव लिंक'चा मोठा खुलासा )

अकोल्यातील जमीर जाहीरउद्दीन काझी या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. हरियाणा पोलिसात आधीच गुन्हा दाखल असल्याने या आरोपीला आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. गेमिंग ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या अशा फसवणुकीच्या प्रकारांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोशल मीडियाचा वापर करताना तरुणांनी सावध राहावे, असे आवाहन देखील या निमित्ताने केले जात आहे.
 

Topics mentioned in this article