Shocking news: 'ब्लाईंड मर्डर' पोलीसांनीही अपेक्षा सोडली होती, पण एका वहीतल्या सहीने कमाल केली, थरारक उलगडा

पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली कार, बेसबॉल बॅट आणि मोबाईल जप्त केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात नागिन मोड पुलाखाली सापडलेल्या मृतदेहाच्या खूनाचा तपास यशस्वी झाला आहे
  • राजस्थानच्या वीरू जाटचा खून त्याच्या प्रेयसी रीना किरार आणि तिच्या जुन्या प्रियकर अरुण पटेल यांनी केला होता
  • मृतदेहाचे हात-पाय बांधलेले असून तोंडावर टेप लावलेली होती, मृतदेह 6 ते 7 दिवस जुना आणि सडलेला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एक असा खून जो ब्लाईंड मर्डर म्हणूनच गणला गेला होता. खून्यापर्यंत पोहोचणे जुणू अशक्य झालं होतं. अशा केसचा छडा लावण्यात पोलीसांना यश आलं आहे. मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यात नॅशनल हायवे-45 वरील नागिन मोड पुलाखाली सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. राजस्थानच्या वीरू जाट नावाच्या तरुणाची त्याच्याच प्रेयसीने जुन्या प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. खून पचला होता पण एका शालेय वहीमुळे या 'ब्लाईंड मर्डर'चा उलगडा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह 4 आरोपींना अटक केली आहे.

पुलाखाली सापडला कुजलेला मृतदेह
तीन दिवसांपूर्वी भोपाळ-जबलपूर महामार्गावर एका गोणीत तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे हात-पाय बांधलेले होते. त्याच्या तोंडावर टेप चिकटवली होती. मृतदेह 6 ते 7 दिवस जुना असल्याने तो पूर्णपणे सडला होता. ज्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. यावेळी पोलीसांना घटनास्थळी एका पिशवीत बूट, कंगवा आणि एका लहान मुलाची होमवर्क नोटबुक सापडली होती. ही नोटबुकच पुढे या तपासात सर्वात मोठा पुरावा ठरली.

Advertisement

नक्की वाचा - Shocking news: पहिला सिनेमा सुपरहिट, पण नशिबाचे फेरे! 'या' अभिनेत्यावर आता आलीय रिक्षा चालवण्याची वेळ

फेसबुक मैत्री आणि प्रेम त्रिकोण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचा वीरू जाट आणि नरसिंगपूरची रीना किरार यांची फेसबुकवर ओळख झाली होती. वीरू अनेकदा रीनाला भेटायला मध्य प्रदेशात येत असे. ही बाब रीनाचा जुना प्रियकर अरुण पटेल याला समजली. यातूनच वीरूचा काटा काढण्याचा कट रचण्यात आला. 29 एप्रिल 2026 रोजी रीनाने वीरूला सांखेडा येथील घरी बोलावले. तिथे आधीच रीनाचा पहिला प्रियकर अरुण आणि त्याचे साथीदार हजर होते. त्यांनी वीरू येताच त्याच्यावर बेसबॉल बॅटने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. 

नक्की वाचा - Jalgaon News: सोशल मीडियावर सूत जुळलं, तिने त्याच्यासाठी बांगलादेश सोडलं! पण जळगावात आल्यानंतर भलतचं घडलं

असा झाला खुलासा
हत्येनंतर आरोपींनी मृतदेह XUV 700 गाडीतून नेऊन पुलाखाली फेकून दिला. त्यानंतर ते फरार झाले. हा खून पचला होता. ज्यावेळी मृतदेह पोलीसांच्या हाती लागला त्यावेळी तो पुर्ण पणे सडला होता. अशा स्थितीत तो कोणाचा मृतदेह आहे हे समजायला तयार नव्हते. त्यामुळे हा एक ब्लाईंड मर्डर म्हणूनच गणला जात होता. मात्र पोलीसांना जागेवर मिळालेली पिशवी महत्वाची ठरली. एक पिशवीत एक वही होती. त्या वहीवर एका लहान मुलाची सही होती. त्या सहीच्या आधारे हा मुलगा आरोपी रीना किरारच्या घरातला होता हे समोर आले. त्या आधारे पोलीसांनी सुत्र हलवली. आरोपीच्या घरी पोलीस गेले पण ते तिथून फरार झाले होते. शेवटी  उज्जैनमधून सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली कार, बेसबॉल बॅट आणि मोबाईल जप्त केले आहेत.