जाहिरात

Crime News: 'तो' जिवंत तरी ही त्याचा बनला मृत्यूचा दाखला, मालेगावात हे कसं घडलं? सत्य ऐकून हैराण व्हाल

मालेगावमध्ये स्वतःचाच बनावट दाखला बनविण्यात आल्याचा निनावी अर्ज आझाद नगर पोलिसात दाखल झाला होता.

Crime News: 'तो' जिवंत तरी ही त्याचा बनला मृत्यूचा दाखला, मालेगावात हे कसं घडलं? सत्य ऐकून हैराण व्हाल
नाशिक:

जिवंत असतानाच मृत्यूचा दाखला बनवण्याचा प्रकार मालेगावमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे जिवंतपणीच स्वत:चा स्वत: मृत दाखला या बहादरानं बनवला आहे. मित्राच्या मदतीने हा बनावट दाखला बनवला गेला.आधी मालेगावात बनावट जन्म दाखल्याचे प्रकरण गाजत असताना आता बनावट मृत्यू दाखला प्रकरण समोर आल्याने पुन्हा एकदा मालेगाव शहर चर्चेत आले आहे. मालेगावात बनावट जन्म दाखला घोटाळा गाजत असतानाच आता मालेगावातील रविवार वॉर्डात राहत असलेल्या  मोहम्मद सूफियान मोहम्मद दस्तगीर या 30 वर्षीय तरुणाने आपला मित्र मन्सूर अहमद सिराज अहमद याच्या साथीने स्वतःचा बनावट मृत्यूचा दाखला बनवला. तो महापालिकेच्या प्रभाग चारचा असल्याचे भासविण्यात आले. या प्रकरणी या दोघांविरुद्ध आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजप नेते व माजी खा.किरीट सोमय्या यांनी आधीच मालेगावमधील बनावट जन्म दाखला घोटाळा समोर आणला होता. या माध्यमातून बांगलादेशी- रोहिंग्या मुसलमानांना भारतीय बनविण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानुसार शासनामार्फत या प्रकाराच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या प्रकरणी तत्कालीन तहसीलदार, नायब तहसीलदार यांनाही निलंबित करण्यात आले होते.  तर 23 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणामुळे आधीच मालेगाव तपास यंत्रणांच्या रडारवर आहे.

ट्रेंडिंग बातमी - Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

मालेगावमध्ये स्वतःचाच बनावट दाखला बनविण्यात आल्याचा निनावी अर्ज आझाद नगर पोलिसात दाखल झाला होता. या अर्जाची पोलिसांनी गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. महापालिकेच्या प्रभाग चारचा अभिप्राय मागितला असता हा दाखला बनावट असल्याचे समोर आले. ज्याच्या नावाने बनावट दाखला बनविण्यात आला, तो मोहम्मद सुफीयान मोहम्मद  दस्तगीर यांच्यावर बचत गटाचे कर्ज होते. मृत्यू दाखला सादर केल्यानंतर हे कर्ज माफ होईल असे कोणीतरी त्यास सल्ला दिला. त्या नुसार त्याने मित्र मन्सूर अहमद सिराज अहमद याच्या मदतीने बनावट मृत्यू झाला तयार केला.

ट्रेंडिंग बातमी - Raj Thackeray Speech : "अंधश्रद्धेतून बाहेर या", राज ठाकरेंनी 'महाकुंभ'च्या पवित्र स्नानाची उडवली खिल्ली

मालेगावमध्ये बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचे  समाजातच पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवली. त्यांनी बनावट मृत्यू दाखला तयार करण्याऱ्या दोघांनाही अटक केली आहे. शिवाय त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रकरणी पोलिस सखोल तपास करीत आहे. या घटनेनं मात्र सगळीकडे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. कर्ज माफ माफ होण्यासाठी पत्करलेला शॉर्टकट या दोघांच्या मात्र चांगलाच अंगलट आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: