Crime News : उधारी परत न केल्याची शिक्षा, 2 हजार रुपयांसाठी मित्राला संपवलं

Karnataka News: एका क्षुल्लक कारणामुळे मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मित्राची निघृणपणे हत्या...

Karnataka News : कर्नाटकातून एक थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. बैलहोंगल तालुक्यातील गिरयाला गावात एका क्षुल्लक वादावरुन एका तरुणाने आपल्याच मित्राची अत्यंत निघृणपणे हत्या केली. एका 30 वर्षांच्या तरुणाने अवघ्या दोन हजार रुपयांचं कर्ज न फेडल्याने आपल्या मित्राची हत्या केली. 

मित्राला दोन हजारासाठी संपवलं...

मृत व्यक्ती मंजूनाथ गौदरने गेल्या आठवड्यात आपला मित्र दयानंद गुंडलूरकडून दोन हजार रुपये उधारीवर घेतले होते. त्याने सात दिवसात उधारीचे पैसे देतो असा शब्द दिला होता. मात्र तो आपलं वचन पूर्ण करू शकला नाही. त्याने पैसे परत केले नाही म्हणून रविवारी दयानंतर त्याच्याकडे पैसे मागायला गेला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. पाहता पाहता या वादाने हिंसक वळण घेतलं. 

नक्की वाचा - Ulhasnagar News: तडीपार करण-अर्जुनचा हैदोस! पत्रकारावर जीवघेणा हल्ला, कारणही आले समोर

उधारी परत केली नाही म्हणून हल्ला...

दयानंदने रागाच्या भरात मंजूनाथवर हल्ला केला. एका धारदार शस्त्राने त्याने मंजूनाथवर हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी जाला. या हल्ल्यात मंजूनाथला जास्त रक्तस्त्राव झाला. गंभीर अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याघटनेनंतर आरोपी दयानंदने पोलिसांसमोर सरेंडर केलं, त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. बैलहोंगल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.