Murder In Love Affair: छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या लव्ह अफेअरबाबत समजल्यानंतर एका तरुणाने कुटुंबियांना मारहाण करत प्रियकराची हत्या केली. प्रियकर दुर्ग जिल्हा रुग्णालयात गार्ड म्हणून नोकरी करत होता. आरोपीने त्याच्या बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केल्यानं तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारांनी साथ न दिल्यानं रुग्णालयातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या दुर्ग जिल्हा रुग्णालयात घडली.येथे गार्डची नोकरी करणाऱ्या एका तरुणाचं आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते.या प्रेमप्रकरणाबाबत दोघांच्याही कुटुंबियांना माहित होतं. त्यामुळे काही दिवसांपासून दोन्ही कुटुंबामध्ये तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांवर बेजबाबदारपणाचा आरोप
घटनेच्या एक दिवस आधी तरुणीचा प्रियकर आणि त्याचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. कुटुंबीयांचा आरोप आहे की, पोलिसांनी तक्रारीची नोंद करून घेतली नाही. त्यानंतर हा वाद इतका वाढला की, शुक्रवारी रात्री आरोपीने कुटुंबीयांसह प्रियकर तरुणासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. या हाणामारीत प्रियकर तरुण गंभीररित्या जखमी झाला. रक्तबंबाळ झालेल्या या तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नक्की वाचा >> हा काय प्रकार! सिडकोने मुख्यमंत्री कार्यालयाला दिली दिशाभूल करणारी माहिती, लॉटरी धारकांची झाली फसवणूक
रात्री दोन वाजेपर्यंत सुरु होतं वादविवाद
मुलाची हत्या झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि स्थानिक लोक रात्री 2 वाजता जिल्हा रुग्णालय आणि सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर राडा करत होते. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा देताच लोक तिथून निघून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली जात आहे. आज शवविच्छेदन केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.
नक्की वाचा >> Optical illusion Test : फोटोत समुद्रकिनारा दिसतोय? पण तो समुद्र नाही..क्लिक करून नीट बघा!