'कपिल शर्माच्या शो'मध्ये काम देतो म्हणून सांगितलं,पुढे महिलेसोबत जे घडलं ते भयंकर होतं

आरोपीने 20 मे रोजी रात्री त्याने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी तिने नकार देताच तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली.

Advertisement
Read Time: 2 mins

मनोज सातवी, वसई

कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं सांगून 26 वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. आरोपीने महिलेला मारहाण करत धमकी दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आनंद सिंह असं आरोपीचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

स्वप्ननगरी मुंबईत येऊन चंदेरी दुनियेत आपलं स्वप्न साकार करण्याच्या मोहात अनेक तरुण-तरुणी असतात. आपले नशीब आजमवण्यासाठी अनेकजण मुंबईत येतात. यापैकी काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काहींचं स्वप्न पूर्ण होण्याच्या नादात आयुष्य उद्ध्वस्त होतं. असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातच्या सूरत येथील 26 वर्षीय विवाहितेसोबत घडला आहे.

(नक्की वाचा- भावा-बहिणीने अश्लील व्हिडीओ पाहिला, त्यानंतर जे घडलं त्याने संपूर्ण कुटुंब हादरलं)

माझी मुंबईत खूप ओळख आहे. तुला सिनेसृष्टीत काम देतो. कपील शर्माच्या शोमध्ये काम देतो, असं आरोपी आनंद सिंह याने पीडित महिलेला आमिष दाखवलं. आरोपी तिला सूरतहून नालासोपारा पूर्वेच्या मोरेगव येथील घरी घेऊन आला. 20 मे रोजी रात्री त्याने पीडित महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी तिने नकार देताच तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याबद्दल कुठेही वाच्यता केल्यास ठार करेन अशी धमकी देखील आरोपी आनंद सिंहने पीडित महिलेला दिली. 

(नक्की वाचा-  देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?)

पीडित महिलेने न घाबरता तुळींज पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुळींज पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी आनंद सिंह याला बेड्या ठोकल्य. याप्रकरणी तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article