Kolhapur News: व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सावकाराचा महिलेवर वारंवार अत्याचार, 300 नग्न व्हिडीओ काढले अन्..

व्याजाच्या पैशांच्या बदल्यात एका सावकाराने महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. अश्लील व्हिडिओ काढून महिलेला ब्लॅकमेलही करण्यात आलं. कोल्हापुरातही अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kolhapur Woman Physically Assaulted

विशाल पुजारी, प्रतिनिधी 

Kolhapur Crime News : व्याजाच्या पैशांच्या बदल्यात एका सावकाराने महिलेवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. अश्लील व्हिडिओ काढून महिलेला ब्लॅकमेलही करण्यात आलं. कोल्हापुरातही अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड न झाल्याचा गैरफायदा घेत एका सावकाराने महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.कोल्हापूरच्या मुडशिंगी गावातील अमित सावंत या सावकाराविरोधात पीडित महिलेनं तक्रार दाखल केली आहे. या संशयित आरोपी अमितने केवळ अत्याचारच केला नाही,तर पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेलही केल्याचं उघडकीस आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला एका सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते.घरगुती अडचणींमुळे ड्रायव्हर म्हणून सोबत येणाऱ्या अमित सावंतकडून तिने 10 टक्के व्याजाने दोन लाख रुपये घेतले होते.  परंतु,आर्थिक ओढाताण झाल्याने व्याजाचे हप्ते थकले आणि त्यानंतर आरोपीने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली.

Advertisement

नक्की वाचा >> New Train: मुंबई ते विदर्भ प्रवास आता अधिक सोपा! नवी रेल्वे धावणार; पाहा तुमच्या शहरात आहे का स्टॉप?

नराधमाने मोबाईलमध्ये नग्न व्हिडिओ आणि फोटो काढले

पीडित महिला कामाच्या निमित्ताने प्रवासात असताना आरोपीने कधी हॉटेलवर तर कधी कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तसच मोबाईलमध्ये तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ आणि फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकीही दिली. आरोपी अमितकडे 300 व्हिडिओ असल्याचा खळबळजनक आरोप महिलेनं केला आहे.

पीडितेने नोव्हेंबर 2025 पर्यंत व्याजासह संपूर्ण 2 लाख 10 हजार रुपये परत केले होते. तरीही,"अजून 25 हजार रुपये बाकी आहेत"असे म्हणत नराधम अमितने महिलेचा छळ सुरूच ठेवला. त्याने हे अश्लील व्हिडिओ कार मालकाला पाठवून महिलेच्या कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या जावयालाही आरोपीने बेदम मारहाण केली.