Pune News: पुण्यात 'या' ठिकाणी नसरापूर घटनेची पुनरावृत्ती, गिरणी चालकाच्या संतापजनक कृत्याने महाराष्ट्र हादरला

पुण्याच्या थेऊर मध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सहा वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर गिरणी चालकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Theur Minor Girl Physically Assaulted
पुणे:

यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी 

Pune Theur Crime News Today:  पुण्याच्या थेऊर मध्ये नसरापूर घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.सहा वर्षांच्या अल्पवयीन चिमुकलीवर गिरणी चालकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या आजोबाकडे पुण्याजवळील थेऊर मध्ये राहालला आलेल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. पीडित मुलगी पुण्यात राहणारी असून ती आजोबाकडे उन्हाळी सुट्टीसाठी आली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल, आरोपीला अटक 

मिळालेल्या माहितीनुसार, आजोबाच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपीला ताब्यात घेऊन लोणी काळभोर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.नसरापूर पर्वतीनंतर आता थेऊरमध्ये अल्पवयीन चिमुरडीच्या लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण रेल्वे स्थानकात झोपलेल्या प्रवाशांचे मोबाईल कोण चोरायचे? 'ते' तीन चोरटे अखेर सापडले

नसरापूरच्या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्र हादरला 

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुलीला गोठ्यात नेऊन नराधम भीमराव कांबळेनं अत्याचार केला होता. त्यानंतर संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली होती. गावातील ग्रामस्थांसह पुणेकरांनी नवले पुलावर निषेध आंदोलन करत ठिय्या मांडला होता.आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी जोर धरत असून याप्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरु आहे. दरम्यान, आज मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेत पंचनामा केला.

नक्की वाचा >> Sangli News: सांगलीच्या 'या' गावात घडतात अघटित घटना..एक थेंबही दूध विकलं जात नाही, कारण वाचून हादरूनच जाल