6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक शोषणाचा प्रयत्न करीत होता नराधम, अचानक माकडं आली अन्...

आरोपी तरुण आक्षेपार्ह कृत्य करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच दरम्यान एका माकडांचा समूह तेथे दाखल झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
बागपत:

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बागपतमध्ये माकडांनी एक सहा वर्षांच्या मुलीचं शोषण होण्यापासून रोखलं आहे. आरोपी तरुण सहा वर्षांच्या मुलीला फसवून एका निर्जन स्थळी घेऊन गेला. येथे त्याने चिमुरडीचे कपडे काढले आणि तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच दरम्यान एका माकडांचा समूह तेथे दाखल झाला. त्यांना पाहून तरुण घाबरला आणि तेथून पळ काढला. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलीस त्याचा तपास करीत आहेत. या सीसीटीव्हीमध्ये तरुण त्या चिमुरडीला घेऊन जाताना दिसत आहे. 

डोला गावात राहणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांनी दावा केला आहे की, शनिवारी एका तरुणाने त्यांच्या मुलीची फसवणूक करून एका निर्जन ठिकाणी असलेल्या घरात घेऊन गेला. येथे त्याने तिचे कपडे काढले आणि तिचं लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. मात्र अचानक माडकांचा समुह त्या ठिकाणी आल्याने तरुण तेथून पळून गेला. 

नक्की वाचा - Shocking! पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत; खाली पत्नी पुजा-अर्चा करण्यात लीन

तरुणाने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली...
पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, माझी मुलगी बाहेर खेळत होती. तेव्हा आरोपी तिला आपल्यासोबत घेऊन गेला. ही बाब सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. आरोपी तरुणाने माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. माकडं नसते आले तर माझ्या मुलीचा जीव गेला असता, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे.