Vasai News : आग पाहण्यासाठी रस्त्यावर गेला अन् जागीच मृत्यू; मुंबई अहमदाबाद महामार्गावरील धक्कादायक घटना

या घटनेत मोठी वित्तहानी झाली असून काही कामगार जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून असलेल्या आर्टेमिस इलेक्ट्रिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. काल ४ जून रोजी रात्री साडे नऊ वाजताच्या सुमारास अचानक या कंपनीत आग लागली. काही वेळातच ही आग इतकी पसरली की आगीचे मोठ मोठे लोळ लांब परिसरातून दिसून येत होते.  ही कापडाची कंपनी असल्यामुळे काही क्षणात संपूर्ण कंपनीने पेट घेतला. त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आगीची माहिती वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या घटनेत मोठी वित्तहानी झाली असून काही कामगार जखमी असल्याची माहिती मिळत आहे.

नक्की वाचा - Thane News: शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मद्यधुंद अवस्थेत गोंधळ? महिलेच्या अंगावर गाडी घातली

दरम्यान येथे एकाचा जीव गेल्याचंही समोर आलं आहे. आग पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी झाली होती. या गर्दीत उभ्या असलेल्या एका तरुणाला महामार्गावरुन जाणाऱ्या टँकरची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते पुढील तपास करीत आहेत. 

वसई पूर्वेला लागलेली आग तब्बल 10 तासांनी आटोक्यात आली. आगीत आर्टेमिस इलेक्ट्रिक कंपनी, गारमेंट कंपनी आणि झुंबर कारखाना जळून खाक झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून असलेली चार मजली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी आली. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन पथकाने शर्थीचचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग बघण्यासाठी महामार्गावर झालेल्या गर्दीमधील एकाला टँकरची धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article