मनोज जरांगे पाटील यांचे निधनाची खोटी बातमी व्हायरल करणाऱ्या युट्युब चॅनेलवर छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. News with komal या युट्युब चॅनेलवर जरांगे यांच्या निधनाची बातमी देण्यात आली होती.
काही वेळातच ही बातमी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. त्यामुळे याची माहिती मिळताच जरांगे यांच्या समर्थकांनी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. सुनील कोटकर यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जरांगे यांच्या निधनाची खोटी बातमी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस आता शोध घेत आहे.
नक्की वाचा - 'राम मंदिरामुळे माझा पराभव', शिर्डीचे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडेंचं वादग्रस्त विधान, नंतर दिलं स्पष्टीकरण
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बरी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. सोशल मीडियावरील कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आधी त्याची पडताळणी करून घ्या असंही पोलिसांकडून सांगण्यात आलं. खोटी बातमी देणाऱ्या चॅनेलचं नाव न्यूज विथ कोमल असं असून सायबर पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.