Crime News : लग्नाचं दिलं वचन पण बहिणच निघाली पत्नी; लग्नाच्या सापळ्यात अडकवणारी भयंकर कहाणी

बंगळुरूमध्ये एका तरुणीसोबत फसवणुकीची घटना समोर आली आहे. ही कहाणी कोणत्याही सस्पेन्स थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Bengaluru crime : बंगळुरूमध्ये एका तरुणीसोबत फसवणुकीची घटना समोर आली आहे. ही कहाणी कोणत्याही सस्पेन्स थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नाही. एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवित दीड कोटींची लूट करण्यात आली. तरुणीने जेव्हा स्वत:चे पैसे मागितले तेव्हा सत्य परिस्थिती पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. मुलीचं संपूर्ण कुटुंब फ्रॉड निघालं. त्यांनी या फ्रॉडमध्ये तरुणाला साथ दिली. तरुणाने बहीण असल्याचं सांगत तरुणीसोबत भेट घडवून आणली होती. प्रत्यक्षात ती त्याची पत्नी निघाली. ही घटना बंगळुरूच्या केंगेरीचा आहे. एका महिलेच्या तक्रारीच्या आधारावर हे प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. तरुणीने सांगितलं की, या तरुणाने तिला लग्नाचं वचन दिलं होतं. श्रीमंत उद्योगपती असल्याचं सांगत तिच्याकडून १.५३ कोटींहून अधिक पैसे उकळले होते. 

पहिल्या भेटीत कोट्यवधी असल्याचा केला बनाव...

तरुणीने जेव्हा तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितलं तर पोलीस कर्मचारीही हैराण झाले. एफआयआरनुसार, तक्रारदार तरुणी व्हाइटफील्ड स्थित एका पीजीमध्ये राहते. नव्याश्रीने सांगितलं, मार्च २०२४ मध्ये ती विजय राज गौडा उर्फ विजय बी. सोबत ओक्कालिगा मॅट्रिमोनी साइटवर भेटली होती. विजयने स्वत:ला बीआरजी कंपनीचा मालक असल्याचं सांगितलं होतं. त्याने कथितपणे २०१९ ची ईडी प्रकरणातील जामीनाची एक कॉपीदेखील शेअर केली आणि ७१५ कोटींची संपत्ती असल्याचा दावा करीत तिचा विश्वास संपादन केला होता. 

संपूर्ण कुटुंबाने मिळून केली फसवणूक...

नव्याश्रीने सांगितलं, आरोपीने तक्रारदार महिलेला लग्नाचं वचन दिलं होतं आणि कुटुंबाची भेट करून दिली होती. यादरम्यान ४ एप्रिल, २०२४ रोजी बँक खात्यातील अडचणीचं कारण देत तरुणाने कथितपणे फोन पेच्या माध्यमातून तिच्याकडून १५ हजार रुपये घेतले. यानंतर तो वारंवार तिच्याकडून पैसे घेत होता. आरोपीने तरुणीसोबत आपल्या कुटुंबाची भेट करून दिली. ज्यामध्ये त्याचे वडील, बहीण, आई यांचा समावेश होता.  

तक्रारदार तरुणीच नाही तर तिचे कुटुंब आणि मित्रमैत्रिणीचीही फसवणूक

आरोपीने तक्रारदार तरुणीच्या मित्रांनाही गुंतवणूक करण्यासाठी उद्युक्त केलं. ज्यानंतर भरत कुमार आणि त्यांचा सहकारी कार्तिकेयने वेगवेगळ्या तारखांवर तक्रारदारच्या खात्यात ६६ लाख आणि शिवकुमारने २३ लाख रुपये ट्रान्सफर केले. जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आली, तेव्हा आरोपीने बँकेचं कारण सांगितलं. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अनेक बँक खात्यातून एकूण १,७५,६६,८९० रुपये एकत्र केले. ज्यातून केवळ २२,५१,८०० रुपये परत केले. ज्यातील १,५३,१५,०९० रुपये शिल्लक आहेत. जेव्हा तरुणी आरोपीच्या घरी पैसे मागण्यासाठी गेली तेव्हा तो आधीच विवाहित असल्याचं तिला कळालं. आरोपीने ज्या महिलेला त्याची बहीण असल्याचं सांगितलं होतं, ती प्रत्यक्षात त्याची पत्नी होती. तीन वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. या प्रकरणात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article