नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पती,त्याचा भाऊ आणि बहिणी बरोबर झालेल्या भांडणातून एका विवाहीतेनं इतकं टोकाचं पाऊल उचललं की सर्वच जण त्याने हादरून गेले आहेत. विवाहीतेने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. पण त्या आधी तिनं भयंकर कृत्य करत आपल्या पोटच्या दोन लेकींनाही विष देऊन मारून टाकल्याचं तपासात समोर येत आहे. पोलिसींनी तसा संशयही वर्तवला आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्या पुर्वी तीने एक व्हीडिओ ही बनवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नक्की प्रकरण काय?
नाशिकच्या आडगाव परिसरात अश्विनी निकुंभ ही आपला पती स्वप्नील बरोबर राहात होती. मात्र तिला तीच्या पतीकडून त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप तीने केला आहे. आत्महत्या करण्यापुर्वी तिने एक व्हीडिओ तयार केला आहे. त्यात आपण आत्महत्या का करत आहोत हे सांगितले आहे. पतीचा भाव आणि बहिणी बरोबर भांडण झाल्यानंतर पती वारंवार त्रास देत होता. जुन्या गोष्टी उकरून काढत होता. आपलं तसं काही नाही हेही त्याला समजून सांगितलं. पण तरीही तो त्रास देत होता. दोन मुलींवरही अधिकार सांगत होता. पण त्या दोन्ही मुली माझा आहेत. तु तुझा कुटुंबा बरोबर रहा मी माझा मुलींनी घेऊन निघून जाते असा व्हीडिओ तीने तयार केला आहे. त्यानंतर तिने अराध्या आणि अगस्थ्या या आपल्या दोन मुलींना विष दिले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अश्विनीने इमारतीच्या छतावर जाऊन खाली उडी घेत आत्महत्या केला.
हेही वाचा - औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतरावर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे
अश्विनीने आत्महत्या करण्या पुर्वी एक व्हीडिओ बनवला होता. तसे तीने एक सुसाईड नोटही लिहीली होती. त्यात तिने पतीवर गंभीर आरोप केले आहे. तो माझा भुतकाळात झालेल्या गोष्टीवरून त्रास देत होता. माझं तसं काही नाही हे सांगूनही त्रास कमी होत नव्हता. मला ब्लॅकमेल केले जात होते. त्यामुळे मी माझा मुलींसह आत्महत्येचा निर्णय घेत आहे. स्वप्नील याने माझा आईकडून 6 लाख तर मामाकडून 2 लाख रूपये घेतले आहेत. ते त्यांना परत करण्यात यावेत. शिवाय ज्या राक्षसामुळे म्हणजे स्वप्नीलमुळे आत्महत्या करावी लागली त्याला माझा आणि माझा मुलींच्या मृतदेहा पासून दुर ठेवाली. हीच माझी इच्छा आहे. शिवाय माझा मोठ्या मुलीचीही तिच इच्छा आहे. तसा एक व्हीडिओ ही माझा मोबाईलमध्ये आहे. निकुंभां पैकी कुणीही आमच्या मृतदेहाला हात लाऊ नये. हीच शेवटची इच्छा आहे. माझे आणि माझा मुलींचे अंत्यसंस्कार माझी आई आणि भावाने करावेत असंही अश्विनीने सुसाईड नोटमध्ये लिहीले आहे. आमच्या मृत्यू नंतर ही सुसाईड नोट गायब केली जाईल. त्यामुळे माझा मोबाईलही चेक करावा. माझा आणि माझा मुलींचा जीव घेणाऱ्या स्वप्नील, त्याचा भाऊ आणि बहिणीला शिक्षा व्हावी. शेवटचा नमस्कार असे लिहून अश्विनीने सही केली आहे.
पोलिसांचा तपास वेगाने
आश्विनीने आत्महत्या केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटना आडगाव पोलिसांना कळवली. आडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनाही काही धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. दरम्यान अश्विनीने आत्महत्या करण्या पूर्वी दोनही मुलींना विष देऊन मारून टाकल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानंतर तीने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांचा आहे.