Santosh Deshmukh Murder : ही 10 जण लावणार मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा छडा, कशी आहे SIT?

जाहिरात
Read Time: 2 mins

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी राज्य सरकारने या प्रकरणात विशेष एसआयटीची स्थापना केली आहे. 

संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी बुधवारी पाण्यात उतरून आंदोलन केलं. या प्रकरणात अद्यापही मुख्य आरोपी फरार आहे. त्यातील सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच लपून बसल्याची माहिती आहे तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन्ही आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान पुणे सीआयडीचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली  यांच्या अध्यक्षतेखाली नऊ अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या टीममध्ये बीड सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, केजचे पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, बीडचे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलीस हवालदार मनोज वाघ, केज पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गीते यांचा समावेश आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार, शोध सुरू

कोण आहे बसवराज तेली?
डॉ. बसवराज तेली हे MBBS असून मूळचे बेळगावचे आहेत. ते 2010 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पहिल्यांचे त्यांची नियुक्ती जळगाव येथील पाचोरा येथे करण्यात आली. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी काही काळ पुणे येथे शहर उपायुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणून चांगलं काम केल्याचं सांगितलं जातं.