Emotional video before Death : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (Meerut, Uttar Pradesh) कौटुंबिक छळ आणि पतीच्या वागण्याला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फलावदा येथील कुंडा येथे राहणाऱ्या आरुषी नावाच्या या विवाहितेने 10 ऑक्टोबरला विषारी पदार्थ खाऊन जीवन संपवले. या घटनेनंतर मंगळवारी (14 ऑक्टोबर) तिचा एक भावनिक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये या तिने रडत-रडत जीव देण्याचं कारण सांगितलंय.
आत्महत्येपूर्वीचा हृदयद्रावक व्हिडीओ
आत्महत्या करण्यापूर्वी आरुषीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात तिने आपले दुःख व्यक्त केले आहे. तिच्या हातात विषारी पदार्थाचे पाऊचही दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती म्हणाली आहे की, "पाहा, मी विष खात आहे. नवरा आणि सासरच्या लोकांमुळे हे पाऊल उचलत आहे. कुणीही आनंदाने मरत नाही. माझा नवरा दुसऱ्या मुलींशी बोलतो. त्यांनी मला त्रास दिला आहे. मी मरण पावल्यावर माझ्या कानात 'राधा... राधा' हे नामस्मरण करत राहा. मला पुन्हा या जगात यायचे नाही."
( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीच्या रस्त्यावर थरार! कडेवर बाळाला घेऊन महिला फेरीवाल्याने अंगावर डिझेल ओतले; कारण... )
सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप
आरुषीने व्हिडीओत पती आणि सासू-सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ती म्हणाली, "मी माझा नवरा आणि सासरच्या मंडळींमुळे विष खात आहे. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. ते मला माहेरहून घेऊन जात नव्हते. माझा नवरा दारू पितो आणि तो दुसऱ्या मुलींशी बोलतो. तुम्ही माझा व्हॉट्सअॅप (WhatsApp) तपासा." तिने पुढे म्हटले, "मी चांगली मुलगी आहे. मी कधीच काही चुकीचे केले नाही. मी कोणाशीही मोठ्या आवाजात बोलले नाही. मी मरेन, तेव्हा माझ्या कानात फक्त राधा-राधा नामस्मरण करत राहा. मला पुन्हा या जगात यायचे नाही. फक्त एवढे करा."
वर्षभरापूर्वीच लग्न
फलावदा येथील कुंडा येथे राहणारे प्रदीप कुमार यांनी त्यांची मुलगी आरुषीचं लग्न वजीराबाद दिल्ली येथील मनोज नागर यांचा मुलगा तुषार नागर याच्याशी 28 नोव्हेंबर 2024 रोजी केला होता. या लग्नाला अजून वर्षही पूर्ण झाले नव्हते. त्यापूर्वीच आरुषीने आत्महत्या केली.
हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ
मागील दोन महिन्यांपासून आरुषी तिच्या माहेरी राहत होती. आरुषिचे वडील प्रदीप कुमार यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी मुलीच्या लग्नात तब्बल 81 लाख रुपये खर्च केले होते. यात 31 लाख रुपये रोख (Cash), थार (Thar) कार आणि दागिने (Jewellery) यांचा समावेश होता. मात्र, तरीही सासरचे लोक खूश नव्हते. प्रदीप कुमार यांनी सांगितले की, आरुषीचा पती तुषार, दीर मयंक, सासरे मनोज आणि सासू सुरुचि हे तिला सतत त्रास देत होते. तसेच, त्यांनी आरुषिच्या माहेरून आणखी 50 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता. याच छळाला कंटाळून आरुषिने हे टोकाचे पाऊल उचलले.
इथे पाहा Video
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |