Meerut Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मेरठ जेलमधून एक नवी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात पती सौरभच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्कान रस्तोगी आता आई बनणार आहे. मुस्कानची प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या हत्याकांडानं संपूर्ण देश हादरला होता. निळ्या ड्रममध्ये करण्यात आलेल्या या भयंकर हत्याकांडाची चर्चा संपूर्ण देशात सुरु झाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेरठमधील चौधरी चरण सिंह जिल्हा कारागृहात बंद असलेली मुस्कान रस्तोगीनं नुकतीच उलटी आणि पोट दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता मुस्कानच्या पोटातील मुलाचा बाप कोण आहे? सौरभ की तिचा प्रियकर साहील? हा प्रश्न आता विचारला जात आहे. मुस्कानला सहा वर्षांची एक मुलगी आहे. ती सध्या तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. आता मुस्कानच्या या मुलाचा बाप कोण आहे? याचं उत्तर डीएन टेस्टमधूनच मिळणार आहेत.
काय आहे हत्या प्रकरण?
मेरठमधील मुस्कान या तरुणीने आपल्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यासाठी तिने आपल्या प्रियकराचीही मदत घेतली. अमेरिकेतील एका कंपनीत मर्चेंट नेव्हीमध्ये काम करणारा सौरभ लेकीच्या सहाव्या वाढदिवसासाठी मेरठमध्ये आला होता. याची संधी साधत मुस्कानने प्रियकर साहिलची मदत घेतली आणि सौरभचा काटा काढला. मुस्कान इथपर्यंत थांबली नाही तर तिने पतीचे 15 तुकडे केले. सौरभच्या शरीराचे सर्व तुकडे एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंटने सील केलं. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती.
( नक्की वाचा : Love Story : केस कापले, मेसेजची वाट पाहिली, भावाशी गुप्त लग्न करणाऱ्या बहिणीनं भयंकर केलं! )
जेलचा नियम काय?
मुस्कान गर्भवती आहे तर पुढं काय होणार हा प्रश्न आहे. मुस्कानला गर्भवती महिलेला जेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतील. तिच्यावरील आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे तिला जामीन मिळणे अवघड आहे. तिचे प्रकरण 'दुर्मिळातील दूर्मीळ' आहे त्यामुळे तिला फाशी होऊ शकते असं काही जणांचं मत आहे. पण, ती गर्भवती असल्यानं तिच्या शिक्षेत उशीर होऊ शकतो.