Pune Bridge Collapse : पुणे पूल दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी विचारले 8 प्रश्न; प्रशासन देणार का उत्तर?

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पूल कोसळल्याच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत  पूल धोकादायक असल्याचं माहीत असतानाही यावर पर्यटकांची बंदी का आणली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पूल कोसळल्याच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत  पूल धोकादायक असल्याचं माहीत असतानाही यावर पर्यटकांची बंदी का आणली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दुर्घटनेनंतर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. 

पुणे पूल दुर्घटनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

काल मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत.  नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. 

राज ठाकरेंनी उपस्थित केलेले काही प्रश्न..

  1. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली? 
  2. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? 
  3. प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे...'
  4. पण मुळात हा प्रसंग का येतो ? 
  5. सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? 
  6. त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? 
  7. बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? 
  8. आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. 

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं. 

Advertisement
Topics mentioned in this article