MP News : मध्य प्रदेशातील पोलीस एके ठिकाणी 'व्यसनमुक्ती' मोहिमेद्वारे जनजागृती करत असल्याचा दावा करत असतानाच मोरेना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोरसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगाराम वाली गल्ली येथे राहणाऱ्या १९ वर्षीय सर्वेश राठोरने अमली पदार्थांचे व्यसन, आर्थिक अडचणी आणि मानसिक छळाला कंटाळून ३१५ बोअरच्या गावठी पिस्तुलाने गोळी झाडून स्वत:चाच जीव घेतला.
स्वत:चा जीव घेण्यापूर्वी सर्वेशने सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये त्याने गेल्या चार म्हणजेच १४६० दिवसात नशात १० ते १२ लाख रुपये उद्ध्वस्त केल्याच्या वेदना शेयर केल्या आहेत. त्याने थरथरत्या आवाजात पोलीस आणि प्रशासनाला पोरसा नगरमधील वास्तव्य कथन केलं. येथील ६० ते ७० टक्के तरुण पिढी जीवघेण्या नशेच्या आहारी गेली आहे, ज्यामुळे अनेक तरुण आणि त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
morena porsa youth sarvesh rathore 12 lakh loss drug addiction.
३०० ते ५०० रुपयात टरमिनच्या जीवघेण्या डोसची विक्री...
मृत व्यक्तीचे कुटुंबीय आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारावरील तपासानुसार, सर्वेशला टरमिन नावाच्या इंजेक्शनचं व्यसन लागलं होतं. हे औषध रक्तदाबाच्या रुग्णांना बीपी नियंत्रित करण्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली दिलं जातं. पोरसाच्या अग्रवाल मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून या प्रतिबंधित इंजेक्शनचा वापर तरुणांना नशेचं व्यसन लावण्यासाठी केला जात होता.
पोरसा का अग्रवाल मेडिकल स्टोर पुलिस ने किया सील.
एका डोजसाठी ३०० ते ५०० रुपये वसूल केले जात होते. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मेडिकल स्टोअरचा मालक त्यांच्या मुलाला पैशांसाठी त्रास देत होता. या दबावामुळे आणि शारीरिक-आर्थिक त्रासातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. सर्वेशचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून ज्यामुळे जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस आणि ड्रग्ज विभागात खळबळ उडाली आहे. पोरसा पोलिसांनी अग्रवाल मेडिकल स्टोअरच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करीत मेडिकल सील केलं आहे.