मुंब्र्यात सर्वांनाच हादरवून टाकणारी एक घटना घडली आहे. याघटनेमुळे आई बाप पोटच्या गोळ्याबाबत इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतात याची कल्पनाच करवत नाही. मुंब्र्यातील एका दाम्पत्याला पाच मुलं आहेत. त्यांना साभाळायचं कसं, यातून एका मुलीची हत्या करण्याचे त्यांनी ठरवले. त्यातून दिड वर्षाच्या तान्हुलीला संपवण्याचा निर्णय घेत तिला जखमी केलं. रुग्णालयात नेण्याचा बनाव केला. तिथेच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कोणाला काही समजण्या आत या चिमुरडीला दफनही करण्यात आलं. पण एक निनावी पत्र मुंब्रा पोलिसांना मिळालं आणि सर्वांनाच हादरवून टाकणाऱ्या या हत्याकांडाचा परदाफाश झाला.
कशी केली हत्या?
जाहीद शेख आणि नूरानी हे दाम्पत्य मूळचे झारखंड आहेत. काही महिन्या पुर्वीच ते मुंब्र्यात आले. त्यांना तीन मुली आणि दोन मुलगे अशी एकूण पाच मुले आहेत. घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. दोघही तसे अशिक्षित आहेत. मदरशामध्ये जाहीद कुराण शिकवायचा. हेच त्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यात येवढ्या सर्वांचं भागत नव्हतं. मुलांना सांभाळणं कठीण झालं होतं. त्यामुळे यांनी आपल्या दोन मुलींना मारण्याचं ठरवलं. त्यातील लबीबा ही दिड वर्षाची होती. तर हबीबा साडेतीन वर्षाची होती. त्यांनी आधी दिड वर्षाच्या लबीबाच्या डोक्यावर वार केले. तिला जबर जखमी केली. त्यानंतर रूग्णालयात नेण्याचा बनाव केला. डॉक्टरांना संशला आला. मात्र या दोघांनीही उडवा उडवीची उत्तर दिली. त्यांना लबीबाला मुंबईल घेवून जाण्यास सांगितले. मात्र जास्त रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यांनी तिच्या मृत्यूचे पत्र घेतले आणि कोणाला काही समजण्या आत तिला दफन ही केले.
निनावी पत्र आणि पर्दाफाश
दिड वर्षाची चिमुरडी लबीबाचा खुन पचला या अविर्भावात हे दोघे आईबाप होते. मात्र एक पत्राने या दोघांही खेळ खल्लास झाला. या प्रकरणी ठाणे पोलीस उपायुक्त मंडळ 1 येथे एक निनावी पत्र आले होते. या पत्रामध्ये या लबीबाचा फोटो जोडण्यात आला होता. शिवाय तिचा खुन झाल्याचाही उल्लेख होता. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत स्मशानभूमीमध्ये जात लबीबाचा मृतदेह पुन्हा उकरून काढला. त्यानंतर तिच्या शरीरावर पोलिसांना जखमा आढळून आल्या. पोस्टमार्टम केले असता चाकूचे वार असल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात आई-वडिलांची चौकशी केली असता ते संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. अन् या दोघांच्याही क्रुरकृत्याचा परदाफाश झाला.
आधीही केला होता खुनाचा प्रयत्न
या दोघांनी या आधीही आपल्या मोठ्या मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याची कबुलीही त्यांनी यावेळी चौकशी दरम्यान दिली. शेवटच्या दोन मुली त्यांना नकोशा झाल्या होत्या. त्यातून त्यांनी दिड वर्षाच्या लबीबाची हत्या केली. तर साडेतीन वर्षाच्या हबीबाची देखील जीभ कापली होती. या संदर्भात झारखंड पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. सध्या या दांपत्याला 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान मृत्यूचा दाखला देणाऱ्या डॉक्टरांवर देखील कारवाई होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.