मनोज सातवी, मुंबई: मुंबईतील मीरा रोड परिसरात अंतर्गत वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. युसुफ अन्सारी असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून यामध्ये सोनू नावाच्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रा रोड मधील नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शांती शॉपिंग सेंटर मध्ये गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी युसुफ नावाच्या व्यक्तीकडून शम्स अन्सारी उर्फ सोनू (38) नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात सोनू याच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युसुफ नावाच्या व्यक्तीकडून हा गोळीबार करण्यात आला असून, हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून पसार झाला. शम्स उर्फ सोनू (38) याचे चष्म्याचे दुकान आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकानात आलेल्या एका व्यक्तीसोबत सोनू चा वाद झाला, त्यावेळी आरोपीने थेट सोनुच्याच्या डोक्यात गोळी घातली, आणि सोनू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. शांती शॉपिंग सेंटर मधील गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, उल्हासनगरच्या आशेळे गावातून उल्हासनगर गुन्हे शाखेने केलेल्या धाड कारवाईत एका बांग्लादेशी दाम्पत्याला ताब्यात घेण्यात आलंय. ही महिला हॉटेल मध्ये वेटर म्हणून काम करीत होती. रितेश वंजारी, संजय शेरमाळे, महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे यांच्या पोलीस पथकाने सापळा रचून मीना मुजिद खान आणि तिचा पती इमोन उर्फ मेहमूद खान असद खान या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलीसाना हस्तांतरित केले आहे.
( HMPV : चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या व्हायरसची एन्ट्री? हॉस्पिटलमध्ये रांगा, वाचा लक्षणं आणि उपाय )