चिता जळण्यापूर्वी प्रियकराने मंगळसूत्र घालावं! मुंबईच्या IT इंजिनिअरची शेवटची इच्छा, संपूर्ण गावात पेटला वाद

Mumbai IT Engineer Ends her life: एकतर्फी निर्णयांमुळे नात्यांचा अंत कसा दुर्दैवी ठरू शकतो, याचा एक थरारक आणि तितकाच हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Mumbai IT Engineer : इंजिनियरच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह बॉयफ्रेंडच्या गावी नेला.
मुंबई:

Mumbai IT Engineer Ends her life: एकतर्फी निर्णयांमुळे नात्यांचा अंत कसा दुर्दैवी ठरू शकतो, याचा एक थरारक आणि तितकाच हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. तब्बल 8 वर्षे जीवापाड प्रेम केलेल्या प्रियकराचे लग्न दुसऱ्याच मुलीशी ठरल्याचे समजताच, एका 26 वर्षांच्या तरुण आयटी इंजिनिअर मुलीने तिचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, तिच्या दु्र्दैवाचा अंत इथेच झाला नाही, तर मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या या मुलीने एक  शेवटची इच्छा लिहून ठेवली होती, ज्याने पुढे जाऊन संपूर्ण गावाचे वातावरण हादरवून सोडले. 

मुंबईतील आत्महत्या आणि 8 वर्षांचे प्रेमसंबंध

 मूळची आंध्र प्रदेशच्या गुंटूर जिल्ह्यातील कोंद्रुपाडु गावची रहिवासी असलेली कीर्ति ही मुंबईमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. गेल्या 8 वर्षांपासून तिचे साई सुमंत नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झाले होते. मात्र, साई सुमंत सध्या कतारमध्ये हार्डवेयर इंजिनिअर म्हणून कार्यरत असताना, त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवले. या धक्क्यातून सावरू न शकल्याने कीर्तिने 14 जुलै रोजी मुंबईतील तिच्या पीजी (PG) रूममध्ये आत्महत्या केली.

( नक्की वाचा : Dombivli News :डोंबिवलीत 73 वर्षांच्या आजीबाईंना 'लिव्ह इन' ची हौस नडली, 57 लाख गेले, बँक खाते रिकामे )

मृतदेह दारात ठेवून कुटुंबीयांचे आंदोलन

मुंबईत 16 जुलै रोजी कीर्तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी एक धक्कादायक पाऊल उचलले. कीर्तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिची शेवटची इच्छा व्यक्त केली होती की, तिच्या मृतदेहाला प्रियकराच्या हाताने मंगळसूत्र घातले जावे आणि त्याचाच पैतृक गावात अंत्यसंस्कार व्हावे. 

Advertisement

या इच्छेची पूर्तता करण्यासाठी कीर्तिचे कुटुंबीय थेट तिचा मृतदेह घेऊन पोंडुरु गावातील साई सुमंतच्या घराबाहेर पोहोचले. मृतदेह दारात ठेवून कुटुंबीयांनी जोरदार निदर्शने सुरू केली आणि साईने तातडीने परत येऊन तिच्या मृतदेहाशी लग्न करावे, अशी मागणी लावून धरली.

( नक्की वाचा : बेडरुममध्ये पतीचा मृतदेह, शेजारी जखमी मुलगा; आरोपी पत्नी बेडवर झोपून पाहत होती रील! वाचा काय आहे प्रकार? )

घराचे कुलूप तोडले आणि....

या अनपेक्षित आंदोलनामुळे प्रचंड घाबरलेल्या साईच्या कुटुंबीयांनी घराजवळून पळ काढत घराला टाळे ठोकले. मात्र, संतप्त झालेल्या जमावाने घराचे कुलूप तोडून आपला निषेध सुरूच ठेवला, ज्यामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये हाणामारीची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळाची माहिती मिळताच टंगुटुरु पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (SI) फणी भूषण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. 

अखेर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मध्यस्थीनंतर, साईच्या कुटुंबीयांनी पोंडुरु गावातच अंत्यसंस्कार करण्यास संमती दिली. त्यानंतर अत्यंत तणावाच्या वातावरणात स्थानिक लोकांच्या मदतीने कीर्तिच्या पार्थिवावर तिथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Advertisement

Topics mentioned in this article