जाहिरात

बेडरुममध्ये पतीचा मृतदेह, शेजारी जखमी मुलगा; आरोपी पत्नी बेडवर झोपून पाहत होती रील! वाचा काय आहे प्रकार?

Doctor wife arrested husband murder: आपल्याच कुटुंबाचा घातपात झाल्यानंतरही चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख न बाळगता मोबाईल पाहत बसलेल्या या उच्चशिक्षित महिलेचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.

बेडरुममध्ये पतीचा मृतदेह, शेजारी जखमी मुलगा; आरोपी पत्नी बेडवर झोपून पाहत होती रील! वाचा काय आहे प्रकार?
Doctor wife arrested husband murder: या प्रकरणातील आरोपी पत्नी सतत जबाब बदलत आहे.
मुंबई:

Doctor wife arrested husband murder: बेडरुममध्ये पतीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह, शेजारीच आठ वर्षांचा निष्पाप मुलगा रक्ताळलेल्या अवस्थेत मदतीसाठी विव्हळत असलेला आणि अशाही भयंकर परिस्थितीत त्याच खोलीत पलंगावर झोपून मोबाईलवर आरामात रील स्क्रॉल करणारी पत्नी! कोणत्याही थ्रिलर सिनेमातील दृश्यालाही मागे टाकेल अशी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. 

आपल्याच कुटुंबाचा घातपात झाल्यानंतरही चेहऱ्यावर कोणतीही भीती किंवा दुःख न बाळगता मोबाईल पाहत बसलेल्या या उच्चशिक्षित महिलेचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ आता समोर आला असून त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील धारवाडमधील एका उच्चभ्रू आणि अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अपार्टमेंटमध्ये हा थरार घडला आहे. येथील रहिवासी असलेले डॉक्टर किरण होनानवर यांची त्यांच्याच घरात निर्घृण हत्या करण्यात आली, तर त्यांच्या 8 वर्षांच्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. 

या प्रकरणी पोलिसांनी मृत डॉक्टर किरण यांची पत्नी डॉक्टर प्रियंका हिला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी केली जात आहे. ज्या घरात नेहमी हसणे-खिदळणे असायचे, तिथे आता फक्त रक्ताचे डाग आणि भयानक शांतता पसरली आहे.

( नक्की वाचा : Pune News: स्लो पॉयझन, कॉन्ट्रॅक्ट किलर आणि जपानी व्हिडिओ ! केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासे )
 

कसा झाला खुलासा?

हा संपूर्ण प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा डॉक्टर किरण यांच्या नातेवाईकांनी त्यांना वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी त्यांची पत्नी प्रियंका फोन उचलून काहीतरी बहाणे बनवत होती. कधी तिने किरण आराम करत असल्याचे सांगितले, तर कधी ते बाहेर गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. 

मात्र, संध्याकाळ झाली तरी किरण यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने चिंतेत पडलेल्या नातेवाईकांनी थेट त्यांच्या फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला. नातेवाईक जेव्हा घरात पोहोचले, तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

( नक्की वाचा : Latur News: लातूरमध्ये खळबळ! प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर मेहुल राठोड यांनी संपवलं स्वत:चं आयुष्य )
 

सुरक्षित सोसायटी आणि पोलिसांना धक्का

हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात या घरामध्ये कोणत्याही बाहेरील व्यक्तीने प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ही सोसायटी अत्यंत सुरक्षित असून सुरक्षेची चोख व्यवस्था आहे. घटनेच्या वेळी घरात फक्त पती, पत्नी आणि मुलगा हे 3 जणच उपस्थित होते. 

पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा जखमी मुलाचा श्वास सुरू असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस अधिकारी घरात आले तेव्हा आरोपी महिला एका खोलीत पलंगावर पडून मोबाईलवर रील पाहत होती, तर पतीचा मृतदेह दुसऱ्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सध्या पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, आरोपी पत्नी वारंवार आपले जबाब बदलत असल्याने हत्येचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com