मुंबईच्या नागपाडा परिसरात एक सर्वांनाच हादरवून सोडणारी घटना घडली आहे. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची पाण्याची टाकी साफ करण्यासाठी 5 सफाई कामगार उतरले होते. त्यातल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. तर जण गंभीर जखमी आहे. त्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या टाकीतून कामगारांना बाहेर काढले. त्यांना तातडीने जवळच्याच जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यातल्या चार जणांना मृत घोषीत करण्यात आले. तर एकावर लगेचच उपचार सुरू करण्यात आले. हसीपाल शेख वय 19, राजा शेख वय 20, जेऊल्ला शेख वय 36, इमांदू शेख वय 38 या चौघांचा मृत्यू झाला. यातील दोघांची वय एकदम कमी होती.
तर पुरण शेख वय 31 याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. नागपाडा परिसरात एका इमारतीचे काम सुरू होते. त्याची पाण्याची टाकी साफ करायची होती. त्यासाठी या सफाई कामगारांना बोलावण्यात आले होते. हे सर्व सफाई कामगार महापालिकेचे कंत्राटी सफाई कामगार होते अशी माहिती समोर येत आहे.