Dadar News: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! दादरमध्ये बसने गाड्यांना कसं उडवलं? पाहा CCTVसह दुर्घटनेचे 11 PHOTOS

Dadar BEST Bus Accident: दादर येथे प्लाझा सिनेमाजवळ बेस्ट बेसचा भीषण अपघात. अपघाताची भीषणता दाखवणारे पाहा 11 फोटो

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dadar BEST Bus Accident: दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात"
PTI
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • दादर येथील प्लाझा सिनेमा थिएटरसमोर बेस्ट बस भीषण अपघात
  • भरधाव बसने 2 कार, 1 टॅक्सी आणि 2 दुचाकींना जोरदार धडक दिली, यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत
  • अपघातानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि मोठी वाहतूक कोंडी झाली होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Dadar Best Bus Accident CCTV Footage: दादर येथील प्लाझा सिनेमा थिएटरसमोर बेस्ट बसचा सोमवारी (8 जून) सकाळी भीषण अपघात झाला आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव बसने दोन कारसह अनेक वाहनांना जोरदार धडक दिली.

Photo Credit: PTI

या भीषण अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत, यापैकी एकाचा मृत्यू झाला.

Photo Credit: PTI

अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दादरमध्ये वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली होती. 

Photo Credit: PTI

चालकाचे नियंत्रण सुटले अन् एकापाठोपाठ एक वाहनांना उडवले

प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास दादरमधील प्लाझा सिनेमाजवळ हा अपघात घडला.

Photo Credit: PTI

बेस्ट बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या या भरधाव बसने रस्त्यावरील दोन कार, एक टॅक्सी आणि दोन बाईकला एकापाठोपाठ एक जोरदार धडक दिली.

Advertisement

Photo Credit: PTI

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेच्या वेळी इतका मोठा आवाज झाला की परिसरातील नागरिक हादरून गेले.

Photo Credit: PTI

भीषण अपघातानंतर रस्त्यावरील वाहनांचे भाग मोठ्या प्रमाणावर विखुरले गेले होते.

Photo Credit: PTI

बस कंडक्टरसह चार जण जखमी; सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वार, बेस्ट बसचा कंडक्टर आणि आणखी एक व्यक्ती असे एकूण चार जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने हालचाल करत सर्व जखमींना उपचारासाठी महापालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दादर बेस्ट बस अपघात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद VIDEO

बस चालक पोलिसांच्या ताब्यात; वाहतूक अन्य मार्गावर वळवली

अपघाताची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलीस आणि अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

Photo Credit: PTI

पोलीस आणि प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Photo Credit: PTI

दरम्यान या अपघातामुळे दादरमधील काही मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले होते आणि वाहतूक इतर मार्गांवर वळवण्यात आली होती.

Photo Credit: PTI

परिणामी सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

या बातम्याही नक्की वाचा :

नक्की वाचा : VIDEO: ऐन उन्हाळ्यात पहाटेपर्यंत छळ! नवी मुंबईच्या उलवेतील तरुणीचा तो VIDEO VIRAL, ढसाढसा रडत सत्य उजेडात आणलं

नक्की वाचा : Weather Alert: बापरे! 15 जूनपर्यंत चिंता कायम, उष्णतेची लाट की पावसाचा दिलासा? शेतकरी,सामान्यांसाठी मोठा इशारा