आई की हैवान? अडीच वर्षांच्या चिमुरडीवर जन्मदातीच्या संमतीनंच झाला भयंकर अत्याचार, मुंबईतील भयंकर घटना!

Mumbai Crime News : हे सारं कृत्य तिच्या आईच्या संमतीनेच घडत होते. मुंबईतच्या मलाड भागातील ही धक्कादायक घटना आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ती वेदनेने ओरडत होती... त्या निष्पाप जीवाला बलात्काराचा अर्थही माहित नसेल... आणि तिच्यासोबत इतकी क्रूरता करण्याचा विचार फक्त एक हैवानच करू शकतो.  या प्रकरणातील आणखी एक संतापजनक गोष्ट म्हणजे हे सारं कृत्य तिच्या आईच्या संमतीनेच घडत होते. मुंबईतच्या मलाड भागातील ही धक्कादायक घटना आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

या प्रकरणात पहिल्यांदा अडीच वर्षांच्या निष्पाप मुलीवर प्रथम बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मुंबई पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय आरोपीने मुलीच्या आईसमोर (आरोपी महिला) अडीच वर्षांच्या मुलीसोबत भयंकर कृत्य केले आणि त्यानंतर तिची हत्या केली.

आई हॉस्पिटलमध्ये खोटं बोलली

मालवणी पोलिसांनी 30 वर्षीय महिला (मुलीची आई) आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराला महिलेच्या अडीच वर्षांच्या मुलीच्या कथित हत्या आणि बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. मुलीला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळी हे प्रकरण उघड झाले. हॉस्पिटलमध्ये आरोपी आईनं कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली आणि डॉक्टरांना सांगितले की मुलीला मिरगीचा आजार आहे, त्यानंतर ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी तपासणी दरम्यान मुलीला मृत घोषित केले.

Advertisement

रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुलीला दिलं नवं आयुष्य! तिनेच घेतला आईचा जीव! Instagram नं समोर आलं सत्य )

कशी झाली उकल?

डॉक्टरांना मुलीच्या गुप्तांगावर जखमेच्या खुणा आढळल्या आणि त्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली. वैद्यकीय तपासणीच्या आधारावर मालवणी पोलिसांनी 30 वर्षीय महिला आणि तिच्या 19 वर्षीय प्रियकराविरुद्ध भा.द.वि.च्या वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आरोपी महिला आणि 19 वर्षीय आरोपी मुलामध्ये कथित प्रेमसंबंध होते. महिलेचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. ती गर्भवती असताना तिच्या पतीने तिला सोडले होते. तिने एका मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून आरोपी महिला तिच्या आईच्या घरी राहत होती.

चिमुरडी वेदनेने ओरडत होती...

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने अडीच वर्षांच्या मुलीवर तिच्या आईसमोर बलात्कार केला. मुलगी वेदनेने ओरडत होती आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाच्या आधारावर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकराविरुद्ध भा.द.वि. कलम आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
 
 

Advertisement
Topics mentioned in this article