- भांडुप रेल्वे स्टेशनबाहेर बेस्ट बसने पादचाऱ्यांना चिरडलं
- भांडुपमध्ये बेस्ट बसच्या अपघातात 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी
- भांडुपमध्ये बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक पोलिसांच्या ताब्यात
- पारस दामा, प्रतिनिधी
Bhandup Best Bus Accident: भांडुप परिसरामध्ये सोमवारी (29 डिसेंबर 2025) रात्री बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याने भीषण दुर्घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री जवळपास 10 वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसने रस्त्यावर चालणाऱ्या अनेक पादचाऱ्यांना चिरडलंय. या घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना औषधोपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक केलीय. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातील माहितीनुसार, बस चालक वाहन मागील बाजूस घेत असताना ही दुर्घटना घडलीय. यावेळेस अनेकांना बसची जोरदार धडक बसली. घटनेत जखमी झालेल्या काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटलं जातंय.
मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. भांडुप पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेर हा अपघात घडलाय. दरम्यान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि लोकसभा खासदार वर्षा गायकवाड यांनी अपघाताच्या चौकशी करण्याची मागणी केली आहे.
(नक्की वाचा: Pimpri Chinchwad News: शांत बस म्हटल्याचा राग, दारूड्या मित्राच्या भावाने डोक्यात घातला दगड; तरुण जखमी)
आरोपी बस चालक पोलिसांच्या ताब्यात
आरोपी बस चालकाची ओळख पटवून पोलिसांनी त्याला अटक केलीय. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलीस बस चालकाची चौकशी करत आहेत. बस मागे घेत असताना अचानक वाहनाचा वेग इतका का वाढवण्यात आला? याबाबतही पोलीस माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
(नक्की वाचा: Navi Mumbai: नवी मुंबई हादरली! बालदिनीच 6 वर्षांच्या विद्यार्थ्याचा छळ, शिक्षकानं 5-6 वेळा थोबाडीत मारायला लावलं, अन्...)
दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींची विचारपूस
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजटी तपासत आहेत. तसेच प्रत्यक्षदर्शींकडूनही दुर्घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा अपघात भांडुपमधील वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय.