जाहिरात

Meerut Crime : 'आमच्या लेकीला फाशीच द्या'; मेरठमध्ये जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे आले पुढे

मुस्कानने पती सौरभच्या मृतदेहाचे 15 तुकडे केले. सर्व तुकडे एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून ड्रम सिमेंटने सील केला.

Meerut Crime : 'आमच्या लेकीला फाशीच द्या'; मेरठमध्ये जावयाच्या न्यायासाठी सासू-सासरे आले पुढे

Meerut Murder by Wife : सात जन्म सोबत राहण्याचं वचन देत ज्याच्यासोबत लग्न केलं, त्याचीच 15 तुकडे करुन हत्या केली. मेरठमध्ये बायकोने नवऱ्याची निर्घृण हत्या केली, त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. सौरभ सिंह राजपूतच्या हत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. दुसरीकडे आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगीच्या आई-वडिलांनी मुलीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. सौरभच्या आई-वडिलांनीही आरोपी सून आणि तिच्या प्रियकराला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सौरभचं मुस्कानवर जीवापाड प्रेम होतं, तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता. मुस्कानसाठी तो आई-वडिलांपासून लांब राहू लागला. आमचा जावई खूप गुणी होता, मात्र आमची लेक वाया गेली होती. सौरभसाठी आम्ही लढू. त्याला न्याय मिळायला हवा. मुस्कानला फाशीची शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी मुस्कानच्या आई-वडिलांकडून करण्यात आली आहे. 

Pune News : अपहरण नाही तर...; स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलासोबत दिवे घाटात नेमकं काय घडलं?

नक्की वाचा - Pune News : अपहरण नाही तर...; स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलासोबत दिवे घाटात नेमकं काय घडलं?

मेरठमधील मुस्कान या तरुणीने आपल्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. यासाठी तिने आपल्या प्रियकराचीही मदत घेतली. अमेरिकेतील एका कंपनीत मर्चेंट नेव्हीमध्ये काम करणारा सौरभ लेकीच्या सहाव्या वाढदिवसासाठी मेरठमध्ये आला होता. याची संधी साधत मुस्कानने प्रियकर साहिलची मदत घेतली आणि सौरभचा काटा काढला. मुस्कान इथपर्यंत थांबली नाही तर तिने पतीचे 15 तुकडे केले. सौरभच्या शरीराचे सर्व तुकडे एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंटने सील केलं. या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. 

सोशल मीडियावर फोटो केला अपलोड...
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सौरभच्या फोनवरुन मुस्कानने कौसानीमधील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते. मात्र सौरभच्या कुटुंबीयांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. जेव्हा मुस्कान आणि साहिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवित विचारपूस केली तेव्हा दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. शेवटी त्यांनी खरं सांगितलं आणि सौरभचा मृतदेह ड्रममध्ये असल्याचं सांगितलं. 

मेरठच्या इंदिरा नगरमध्ये राहणारे सौरभ आणि मुस्कान यांनी 2016 मध्ये प्रेमविवाह केला होता. तेव्हा सौरभने मर्चेंट नेव्हीतील आपली नोकरीही सोडली होती. यावर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. शेवटी कुटुंबीय आणि सौरभमध्ये वादावादी झाल्याने तो मुस्कानसोबत वेगळं राहू लागला. 2019 मध्ये मुस्कानला एक मुलगी झाली. यादरम्यान मुस्कान  सौरभचाच मित्र साहिलच्या प्रेमात पडली. सौरभला याबाबत कळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यावेळी हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. मात्र मुलीच्या भविष्याचा विचार करून दोघांनी एकत्र राहण्याचं ठरवलं. यादरम्यान सौरभ नोकरीसाठी 2023 मध्ये नोकरीसाठी पुन्हा अमेरिकेला गेला. यानंतर मुस्कान आणि साहिल यांच्यातील प्रेम वाढलं आणि त्यांनी सौरभची हत्या करण्याचा प्लान केला. संधी साधत 4 मार्च रोजी त्यांनी सौरभची हत्या केली.