
राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
मुस्लीम धर्मातील पाच महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक असलेल्या जकात प्रणालीशी संबंधित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील काही लोक जकातच्या नावाने पैसे गोळा करण्यासाठी महाराष्ट्रात येतात. त्याउलट काही महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशात जातात आणि जकातच्या नावाने पैसे उकळतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मदिनामध्ये पैगंबरांनी जकात सुरू केला होता, त्यानंतर मदिनातील गरिबी दूर झाली होती, अशी मुस्लीम धर्मियांमध्ये मान्यता आहे. त्यामुळे मुस्लिमांसाठी जकात महत्त्वाचं मानलं जातं. मात्र प्रत्यक्षात जकातच्या नावाखाली पुण्यातील मुस्लीम धर्मियांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. रमजानच्या आधी आणि त्यादरम्यान, पुण्यात बेकायदेशीरपणे पैसे उकळणाऱ्या 30 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे लोक ना मौलाना आहेत, ना मदरशाचे विद्यार्थी. मात्र तरीही जकातच्या मानाखाली पैसे उकळले जात असल्याचं दिसून येत असल्याचा दावा पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी केला आहे.
या मुस्लीम बांधवांनी केंद्रीय गृह सचिवांना 2023 मध्ये या फसवणुकीसंदर्भातील एक पत्र पाठवलं होतं, ज्यामध्ये गोळा केलेले पैसे देशविरोधी कारवायांसाठी वापरले जाऊ शकतात असा इशारा देण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे जकातच्या नावाखाली दरवर्षी केवळ महाराष्ट्रातच साडे दहा हजार कोटींची फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पोलिसांनी या धार्मिक कायद्याविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे अद्याप तरी यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं, झुबेर पिरजादे यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Drugs Smuggling : पाकिस्तानातून ड्रोनने मागवायचा ड्रग्ज, ठिकाणही ठरलेलं; पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या
जकात मिळवण्याची पद्धत काय आहे?
सर्वसाधारणपणे ज्या मदरशात पैशांची आवश्यकता आहे, तेथील परिसरातील मुस्लीम कुटुंबीयांकडून जकात मागणं अपेक्षित असतं. मात्र पुण्यातील काही मदरशातून सफिरांना (प्रवास/सफर करून येणारे) दुसऱ्या राज्यात विशेषत: उत्तर प्रदेशात पाठवलं जातं आणि उत्तर प्रदेशातील सफिरांना महाराष्ट्रात पाठवलं जातं.
जकात धार्मिकतेशी जोडला असल्याने मुस्लीम बांधव मदरशांसाठी लाखोंमध्ये जकात देतात. मात्र त्यांची फसवणूक होत आहे. महाराष्ट्रातच ही फसवणूक १० हजार कोटींच्या जवळपास असल्याचा दावा काही मुस्लीम संघटकांकडून केला जात आहे. या फसवणुकीचे व्हिडिओ समोर आले असून चुकीच्या पद्धतीने जकात आकारला जात असल्याचं दिसून येत आहे.
फसवणूक, गैरवापर आणि गुंतवणूक!
- अशी भीती आहे की गोळा केलेले निधी चुकीच्या उद्देशांसाठी वापरले जात आहेत, कारण पैसे गोळा करणाऱ्यांची ओळख तपासण्यासाठी कोणतीही ठोस प्रणाली नाही.
- काही मशिदी गोळा केलेले जकातचे पैसे संपत्तीमध्ये गुंतवतात, ज्याचा गरीब मुस्लिमांना कोणताही थेट फायदा होत नाही.
- काहींनी फक्त जकात गोळा करण्यासाठी खोटे मदरसे स्थापन केले आहेत, आणि त्यांना भारतातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणात निधी मिळतो.
- मदरशांची स्थिती मात्र जसच्या तस राहते, पण त्यांना चालवणाऱ्यांची संपत्ती वाढत जाते.
जकात प्रणाली म्हणजे नेमकं काय?
- जकात म्हणजे मुस्लीम समाजातील लोकांना गरजूंना मदत करण्यासाठी द्यावी लागणारी देणगी
- जकात हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. जकात हे संपत्ती शुद्ध करण्याचे आणि समाजाच्या उन्नतीचे साधन आहे
- जकात हा मुस्लीम धर्मामध्ये एक दानाचा प्रकार आहे.
- जकात अरबी शब्द 'जका' पासून आला आहे, ज्याचा अर्थ शुद्धीकरण आणि वाढ असा होतो
- जकात हे कुराणच्या क्रमवारीनुसार, प्रार्थना (नमाज) नंतर महत्त्वाचे आहे
- मुस्लिमांसाठी जकात हे एक धार्मिक कर्तव्य आहे
- संपत्ती शुद्ध करण्याचे आणि समाजाच्या उन्नतीचे साधन म्हणजे जकात प्रणाली अवलंबली जाते
- जकात हे उपासनेचे देखील महत्त्वपूर्ण कार्य आहे
- जकात हे धर्मादाय आणि उपासनेचा एक विहित प्रकार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world