Nagpur Crime: 'मी तुमच्यावर प्रेम करते', चिठ्ठी लिहून गळ्याला दोर लावला, माहेरी आलेल्या विवाहितेचे टोकाचे पाऊल

वारंवार भांडणे होत असल्याने मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूआधी तिने पतीला लिहलेली चिठ्ठीही पोलिसांनी जप्त केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Married Women Ended Life: नागपुर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरच्या महादुला (कोराडी) परिसरात एका विवाहितेने आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे. मयुरी मेंढे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून आपल्या माहेरच्या घरी तिने टोकाचे पाऊल उचलले. पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याने मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूआधी तिने पतीला लिहलेली चिठ्ठीही पोलिसांनी जप्त केली आहे. 

नागपुरात विवाहितेची आत्महत्या

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  "मी तुमच्यावर खूप प्रेम करते…” अशा शब्दात पतीसाठी चिठ्ठी लिहित विवाहितेने माहेरी आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना नागपुरमधून समोर आली आहे. मयुरी मेंढे असं या विवाहितेचे नाव असून महादुला परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येपूर्वी मयुरीने भावनिक चिठ्ठी लिहित पतीवर प्रेम व्यक्त केले तसेच मनातील दुःख मांडले, ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. 

Advertisement

Nagpur News: "नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्...", नागपूरमधील धक्कादायक प्रकार

मृत मयुरी लोंढे आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळेच ती मानसिक तणावाखाली होती. वादामुळे महिनाभरापूर्वीच ती माहेरी परतली होती. आपल्या पतीशी तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र पती फोन उचलत नसल्याने ती हताश झाली. याच नैराश्यातून मयुरीने घरातील मंडळी बाहेर गेले असताना टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवले.

पतीवर गंभीर आरोप 

दरम्यान, रात्री घरातील मंडळी परतल्यानंतर मयुरी दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांना शंका आली. त्यांनी तात्काळ घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता मयुरीही बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी माहेरच्या मंडळींनी पतीकडून मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा-  Baramati Election: बारामतीत तिरंगी लढत! काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात दिला तगडा उमेदवार; कोण-कोण मैदानात?)

Topics mentioned in this article