Nagpur Crime: मामीला पाहून भाच्याची नियत फिरली, बेडरुममध्ये शिरला अन् नको ते केलं; नागपुरात खळबळ

 पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली असून प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अल्तमश सलीम शेख असे आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Crime:  नागपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. मामीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी भाच्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मामीला घरात एकटी असताना भाच्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर भाच्याला अटक करण्यात आली आहे. 

भाच्याचे मामीशी अश्लील कृत्य

समोर आलेल्या माहितीनुसार,  नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या 30 वर्षीय भाच्यावर अश्लील वर्तन व छेडछाडीचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी युवकाला अटक केली असून प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद अल्तमश सलीम शेख असे आहे.

Accident News: हौसेनं कार घेतली, देवदर्शनाला निघाले, नियतीच्या क्रुर खेळाने कुटुंब संपलं; 6 जण जागीच गेले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासह यशोधरानगर परिसरात राहते. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी ती आपल्या बेडरूममध्ये कपाटातून मुलाचे कपडे काढत होती. त्यावेळी तिचा भाचा खोलीतच बेडवर झोपलेला होता. महिला कपडे घेऊन खोलीबाहेर पडत असताना आरोपीने तिच्या मागून येत तिला पकडण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांकडून आरोपीला अटक 

महिलेने तात्काळ विरोध करत त्याच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर आरोपी काहीही न बोलता तेथून निघून गेला. घटनेनंतर काही दिवसांनी, 24 फेब्रुवारीच्या सकाळी महिला घरी एकटी असताना आरोपी पुन्हा घरात आला. त्याने बेडरूममध्ये जाऊन महिलेचा मागून हात धरत अश्लील वर्तन केल्याचे सांगितले जात आहे. महिलेने धाडस दाखवत त्याला जोरात ढकलले व स्वतःची सुटका करून घेत बाहेर पडली.

Advertisement

दरम्यान, यानंतर पीडितेने यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध छेडछाडीच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सध्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Ratnagiri News: महिला तलाठी ACBच्या जाळ्यात! तहसील कार्यालयामध्येच रंगेहाथ पकडलं; टीप मिळाली अन्...

Topics mentioned in this article