नागपूर: आजारी आईच्या उपचारासाठी न्यायालयाच्या फौजदारी विभागातील महिला लिपिकाच्या कार्यालयात ठेवलेल्या बॅगमधून 35 हजार रुपये चोरणाऱ्या कळमेश्वर येथील एका अस्थायी कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रणय थोरात असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहिणी वाडीभस्मे या फौजदारी विभागात लिपिक आहेत. संध्याकाळीच्या दरम्यान वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश यांच्या चेंबरमध्ये त्या गेल्या होत्या. त्यांची पर्स विभागातच होती. परत आल्यावर त्यांना पर्सची चेन उघडी आढळली. त्यात ठेवलेले 35 हजार रुपये गायब होते. कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी प्रणय थोरात पैसे चोरताना दिसला.
Nanded News : घरात चोरी अन् मांत्रिकाकडे तपास; पुढे गावात जे घडलं ते पाहून धक्काच बसेल!
प्रणय ह एक अस्थायी कर्मचारी असून तो ड्युटी नसतानाही कार्यालयात आला होता. वाडीभस्मे यांच्या तक्रारीवरून सदर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दुसरीकडे, नंदुरबार शहरात चौपाळे रोड येथील विमल हाऊसिंग सोसायटी येथे भुरट्या चोरट्यांनी दोन घर फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. विमल हाऊसिंग सोसायटी येथील निवृत्त शिक्षक संजय विसपुते व सागर रघुवंशी यांच्या घराचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटे, पेट्या उचकटून चोरट्यांनी अंदाजे लाख रुपयांची रोकड लंपास केली.
निवृत्त शिक्षक संजय विसपुते हे खालच्या घराला कुलूप लावून वरील घरात झोपले होते. चोरट्यानी खालील घराचे कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला यात जवळपास 80 हजाराची रोकड चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून परिसरातील संशयितांची चौकशी सुरू आहे
Pune News : 'काकीला आय लव्ह यू कसा म्हणाला?' 35 वर्षांच्या साईनाथचा लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून