Nagpur News: क्रिप्टोकरन्सी-शेअर बाजारातून मोठ्या परताव्याचं आमीष; दोन प्रकरणाती साडेतीन कोटींचा गंडा

Nagpur News: दुबई स्थित 47 वर्षीय राजेंद्र उपाध्याय, 48 वर्षीय संजय गाडे आणि त्यांचा योगेश भालेराव नामी सहकारी अशी आरोपींची नावे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Nagpur Crime News: नागपूर जवळच्या बेसा येथील रहिवासी असलेल्या आणि मिनरल वॉटर प्लांट चालवणाऱ्या 46 वर्षीय महिला व्यावसायिकेची क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली दीड कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. त्यांना आमिष दाखवण्यात आलेल्या बोनसच्या रकमेला धरले तर त्यांना अडीच कोटींचा फटका बसला आहे. 

वैशाली कोढे नावाच्या या महिला व्यावसायिकाची फसवणूक दुबई येथील तीन आरोपींनी केली आहे. 'प्लॅटिनकॉईन' ('Platincoin') नावाच्या एका संशयास्पद मल्टी-लेव्हल मार्केटिंग क्रिप्टोकरन्सी योजनेत काहीच दिवसांत 60 ते 100 टक्के अशा मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याच टोळीने अन्य एका व्यक्तीला  1 कोटी 32 लाख रुपयांचा गंडा घातल्याचेही समोर आले आहे.

60 ते 100 टक्के परताव्याचं आमीष

दुबई स्थित 47 वर्षीय राजेंद्र उपाध्याय, 48 वर्षीय संजय गाडे आणि त्यांचा योगेश भालेराव नामी सहकारी अशी आरोपींची नावे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अलेक्स रेनहार्ट नावाच्या व्यक्तीच्या नेतृत्वाखालील त्यांची जर्मन-ओरिजीन दुबई कंपनीकडून काही दिवसांतच 60 ते 100 टक्के परतावा, पुढील तीन वर्षांसाठी मासिक 20 लाख रॉयल्टी, एक आलिशान कार आणि 'डायमंड पोझिशन'सारख्या बक्षिसांचे आश्वासन देण्यात येऊन त्यांना फसवण्यात आले.

(नक्की वाचा-  Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)

तक्रारीनुसार, कोरोना काळ सुरू असताना वर्ष 2020 च्या नोव्हेंबर-डिसेंबर  मध्ये वैशाली कोढे यांना आमिष दाखवण्यात आले. आरोपींच्या वारंवारच्या दबावामुळे कोढे यांनी आपली तीन एकर शेतजमीन गहाण ठेवून दीड कोटींचे कर्ज घेतले आणि ते आरोपींनी दिलेल्या अनेक बँक खात्यांमध्ये आणि क्रिप्टो वॉलेट्समध्ये हस्तांतरित केले. नंतर तिचा विश्वास संपादन करण्यासाठी 55 लाख रुपये हफ्त्यांमध्ये परत करण्यात आले. मात्र, त्यानंतर आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केले, त्यांचा नंबर ब्लॉक केला आणि 'कॉइनचा दर घसरला आहे' तसेच 'अल्टिमा कॉईन'सारखे (Ultima Coin) नवीन लाँच करण्याचे कारण देत परतावा देण्यास टाळाटाळ केली.

Advertisement

याच टोळीने  नागपूरमधील अनेक गुंतवणूकदारांना एकूण एक कोटीं 32 लाखाहून अधिक रकमेचा गंडा घातल्याचा आरोप आहे. पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघात तसेच माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शेयर बाजारात गुंतवणुकीतून शंभर टक्के परताव्याचे आमिष

याशिवाय अन्य एका गुंतवणूक संबंधी फसवणूक प्रकरणात अन्य दोन आरोपींनी नागपूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाला चक्क 2 कोटी 18 लाखांनी फसवले असल्याचे समोर आले आहे. सहा महिन्यांत शेयर मार्केट गुंतवणुकीद्वारे जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून नागपूर शहरातील कपिल मेश्राम नामक एका बांधकाम व्यावसायिकाला  गंडा घालण्यात आला आहे. 38 लाख रुपयांची गुंतवणूक केली असता त्यांना 76 लाखांचा पोस्ट डेटेड चेक देण्यात आला. त्यानंतर विश्वास ठेवून मेश्राम यांनी स्वतः कडील आणि त्यांच्या मित्र तसेच नातेवाईकांकडून एकूण 2 कोटी 18 लाख रुपये गुंतवले. त्याच्या दुप्पट रकमेचा चेक देण्यात आला मात्र तो धनादेश वटला नाही आणि रक्कम देखील परत करण्यात आली नाही. आरोपींची नावे मनोज नंदनवार आणि विजय माहुर्ले  अशी असून या दोघांविरुद्ध राणा प्रताप नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article