रक्ताच्या थारोळ्यात बाबांचा मृतदेह, घराला बाहेरून कुलुप; नालासोपाऱ्यात आणखी एक धक्कादायक प्रकार 

नालासोपाऱ्यात हत्या, बलात्कार, ड्रग्स तस्करी, चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण लागले वाढू लागले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नालासोपारा:

मनोज सातवी, प्रतिनिधी

वसई तालुक्यातील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर परिसरातील बंद घरात एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रमोदकुमार बिंद उर्फ कतवारू (51) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कालच संतोष भवन परिसरात दोन गटातील झालेल्या हाणामारीतून एकाची हत्या झाली होती, त्यामुळे नालासोपारा परिसर गुन्हेगारीचा अड्डा बनतोय का, असा सवाल निर्माण झाला आहे. या परिसरात हत्या, बलात्कार, ड्रग्स तस्करी, चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने मीरा रोड, वसई, विरार या नव्या पोलीस आयुक्तालयाची निर्मिती केली आहे. मात्र गुन्हेगारीचा आलेख काही कमी होताना दिसत नाही. नालासोपाऱ्यात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना समोर आल्या आहेत.  प्रमोदकुमार उर्फ कतवारू हा त्याच्या दोन मुले आणि एका सुनेसह श्रीराम नगरच्या घरत वाडी येथील जोगेंद्र यादव चाळीत राहत होता. काही दिवसांपूर्वी दोन मुलं आणि सून गावी गेले होते, त्यामूळे प्रमोदकुमार घरी एकटेच होते. वडिलांशी फोनवर संपर्क होत नाही, फोन बंद येतोय म्हणून त्याच्या मोठ्या मुलाने त्याच परिसरात राहत असलेल्या काकाच्या मुलाला फोन करून आपल्या घरी जाऊन खात्री करून फोन करण्यास सांगितले. त्यामुळे काकांचा मुलगा प्रमोद कुमार यांच्या घरी गेला. घराच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावलेले त्याला दिसले.

Advertisement

नक्की वाचा - 'फोनवरून सतत त्रास द्यायचा', गोंदवल्यात आणखी एका मुलीचा धक्कादायक बळी

परंतु दरवाज्याच्या बाजूला खिडकी उघडी असल्याने त्यांना दिसून आले. त्यामुळे खिडकीतून घरात डोकावून पाहिल्यावर त्यांना रक्त आणि बाजूला प्रमोदकुमार जमिनीवर पडल्याचे दिसले. मुलाने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी प्रमोदकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. हे दृश्य बघताच त्याने लगेच पेल्हार पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

Advertisement

पेल्हार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून ही हत्या नेमकी कोणी केली, आणि हत्या करण्यामागचा उद्देश काय होता याचा शोध घेत तपास करत आहेत. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह  पाठवण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article