Nanded News: हॉटेलवर धाड, 6 तरुणी नको त्या अवस्थेत, हायप्रोफाईल रॅकेटची पोलीसांनी केली पोलखोल

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड टाकली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
नांदेड:

छोट्या छोट्या शहरांमध्ये सध्या देहविक्रीची रॅकेट आढळत आहेत. हा रॅकेट हायप्रोफाईल असल्याचं ही समोर आलं आहे. छोट्या शहरात याचा सुळसुळाट झाल्याने पोलीसांसाठी ही चिंतेची बाब आहे. यातून गुन्हेगारी प्रवृत्ती ही वाढत चालली आहे. बाहेरच्या शहरातील लोक ही रॅकेट छोट्या छोट्या शहरात चालवत आहेत. अशीच एक घटना नांदेड शहरात घडली आहे. शहरात चालवलं जाणारं हे सेक्स रॅकेट मुंबईतल्या व्यक्तीकडून चालवलं जात होतं. पोलीसांनी ज्यावेळी धाड टाकली त्यावेळी याचा पर्दाफाश झाला. 

नांदेड शहरात देहविक्रीचं रॅकेट चालवलं जात आहे अशी माहिती नांदेड पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्यांना सापळा रचला. ज्या हॉटेलमध्ये हे सर्व सुरू होतं त्या ठिकाणी धाड टाकण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पोलीसांनी संबंधीत हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी त्यांना तिथे सहा तरुणी नको त्या स्थितीत सापडल्या. या सहा ही तरुणींची पोलीसांनी तिथून सुटका केली. शिवाय या तरुणांनी देहविक्री करायला लावणारे दोन आरोपी ही पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Ashok Kharat: 4650 व्हिडीओ, 451 अकाऊंट डिलीट! खरातच्या SIT चौकशी समोर आले 'हे' 5 धक्कादायक राज

नांदेड जिल्ह्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड टाकली होती. त्यातून त्यांनी देहविक्री व्यवसायाचा भांडाफोड केला होता. नरसी इथल्या राज बार या हॉटेलवर देहविक्री होत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिथे डमी ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर हॉटेलवर धाड टाकत तिथून दोघांना अटक केली आहे.

नक्की वाचा - Ajit Pawar: अशोक खरात, अघोरी पुजा अन् अजित पवारांचा विमान अपघात! 'ते' SMS चौकशीच्या फेऱ्यात

विशेष म्हणजे देहविक्रीसाठी मुंबईहून आणलेल्या सहा तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे. पनवेल इथला आरोपी सोहेल शेख हा इथे देहविक्रीसाठी तरुणी पुरवत होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. ग्रामीण भागात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय उघड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र इथे असलेल्या आंबट शौकीन ग्राहकांना मोकाट सोडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले जात आहेत.