Nida Khan Arrest : नाशिकमधील TCS प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य संशयित आरोपी निदा खानला संभाजीनगरमधून अटक

नाशिकमधील बहुचर्चित TCS प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

Chhatrapati Sambhajinagar : नाशिकमधील बहुचर्चित TCS प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला ताब्यात घेण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार असल्याचं सांगिकलं जात होतं. अखेर छत्रपती संभाजीनगर येथून नाशिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी निदा खानला ताब्यात घेतलं आहे. 

अखेर निदा खानला अटक...

निदा खानवर नाशिकमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. धार्मिक भावना दुखावणे, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे असे अनेक आरोप निदा खानवर लावण्यात आले आहेत.  सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण केल्याचा ठपका तिच्यावर आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपींना कायदेशीर प्रक्रियेपासून वाचवण्यासाठी आणि त्यांना लपण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांचे पथक तिचा सातत्याने शोध घेत होते. तिने अटकेपासून वाचण्यासाठी अटकपूर्व जामिनासाठीही न्यायालयात धाव घेतली होती, मात्र यात तिला यश आलं नाही. अखेर तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी निदा खानला नाशिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या प्रकरणातील इतर धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.

Advertisement