मुंबई ठाण्यातून हाई स्पीड वॉटर बोटद्वारे नवी मुंबई विमानतळ गाठता येणार आहे. येत्या काही महिन्यात ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. वॉटर टॅक्सी हे प्रवासाचे नवे माध्यम लवकरच सुरू होणार आहे. वॉटर टॅक्सी प्रकल्प वास्तवात उतरवण्यासाठी सध्या यंत्रणांकडून जोरदार काम सुरू करण्यात आलं आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई दरम्यान हा प्रवास आणखी गतिमान होणार आहे.
नक्की वाचा - मोबाइल... इन्स्टाग्राम...मैत्री... अन् आयुष्याचा शेवट; जालन्यातील अकरावीच्या विद्यार्थिनीसोबत काय घडलं?
हायस्पीड वॉटर टॅक्सीतून प्रवाशांचा प्रवास सुसाट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वॉटर टॅक्सी प्रकल्प वास्तवात उतरवण्यासाठी सध्या यंत्रणांकडून यासंदर्भातील काम जलद गतीने केले जात आहेत. मात्र सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासकांनी वॉटर टॅक्सी हा प्रकल्प यशस्वी होईल का? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल असा हा प्रकल्प असेल का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.