Navi Mumbai : पत्नी आणि सासूवर काळ्या जादूचे अघोरी प्रयोग, नग्न फोटो केले Viral! वाचा काय आहे भयंकर प्रकार?

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासूवर कथितपणे काळी जादूचे अघोरी प्रयोग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai Crime : नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ( प्रतिकात्मक फोटो)
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Crime : नवी मुंबईतील वाशी परिसरात एका 30 वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासूवर कथितपणे काळी जादूचे अघोरी प्रयोग केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल देखील केले होते.  या प्रकरणी वाशी पोलिसांनी संबंधित पतीविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून सध्या चौकशी सुरू आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात 42 वर्षांच्या महिलेनं वाशी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या पतीविरोधात तक्रार केली आहे. हा सर्व प्रकार एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीमध्ये घडल्याचं या तक्रारीमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील देवरिया येथील आहे.

वाशी पोलीस ठाण्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, “फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, 15 एप्रिल 2025 रोजी आरोपी पतीने तिला आणि तिच्या आईला काही अघोरी धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. हे विधी त्याच्या मेव्हण्याचे लग्न लवकर लावण्यासाठी केल्याचे सांगितले गेले. या काळात त्यांनी दोघींचे नग्न फोटो काढले.”

( नक्की वाचा: Akola News: 16 वर्षाची मुलगी रिक्षात बसताच ऑटो चालक बिथरला, भर रस्त्यात घडला धक्कादायक प्रकार )

या अघोरी प्रकारात आणखी एक गंभीर बाब म्हणजे आरोपीने त्या फोटोचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. “तो तिच्याकडून हे फोटो घेऊन तिला अजमेरला यायला सांगतो. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर त्या फोटोचा प्रसार तिच्या वडिलांना व भावाला पाठवून केला,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 351(2) (गंभीर स्वरूपाची धमकी देणे), 352 (उद्देशपूर्वक अपमान करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न), माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमे आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष व अघोरी प्रथा, काळी जादू प्रतिबंध आणि उच्चाटन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( नक्की वाचा: 2 पती, 1 प्रियकर, दीर आणि सासऱ्यासोबत संबंध, त्यानंतर सासूची हत्या... क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही महिलेची गोष्ट )

पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. “प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. आरोपीचा काळी जादू व अश्लील चित्रफितींच्या प्रसाराशी संबंध असण्याची शक्यता तपासली जात आहे,” असे वाशी पोलिसांनी स्पष्ट केले.

Advertisement
Topics mentioned in this article