Navi Mumbai: पाढे पाठ केले नाहीत म्हणून भयंकर शिक्षा!, 8 वीच्या विद्यार्थिनीसोबत शिक्षिकेनं काय केलं?

त्रास होत असेल तर तुमच्या मुलीला दुसऱ्या क्लासला टाका असे उत्तर या शिक्षिकेने दिले.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • नवी मुंबईत एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने मारल्याचा आरोप
  • विद्यार्थिनीच्या कुटुंबियांच्या मते शिक्षिकेने जवळपास चाळीस फटके मारल्यामुळे मुलीचा हात सुजला
  • मुलीने ही घटना आपल्या आईला सांगितली आणि नंतर कुटुंबियांनी शिक्षिकेकडे जाऊन त्याबाबत जाब विचारला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे एक वेगळे नाते असते. पण कधी-कधी या नात्याला गालबोट लागते. अशीच एक घटना नवी मुंबईत घडली आहे. इथं एका आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिच्या शिकवणीच्या शिक्षिकेने एक भयंकर शिक्षा केली. विद्यार्थिनीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर हीबाब समोर आली. या प्रकरणी संबंधीत शिक्षिकेला  कुटुंबीयांनी जाब ही विचारला. शिवाय त्यांच्या विरोधात रबाळे पोलीस स्थानकात तक्रार ही नोंदवण्यात आली आहे.   

नवी मुंबईतल्या गोठीवली गावात पूनम वडके राहतात. त्यांची मुलगी घरगुती शिकवणीला जाते. ती आठव्या इयत्तेत शिकते. घरगुती शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेने या विद्यार्थिनीला पाढे पाठ करण्यासाठी सांगितले होते. मात्र तिचे पाढे पाठ झाले नाहीत. त्यामुळे शिक्षिकेने या विद्यार्थिनीला शिक्षा केली. तिने थेट पलीथ्याने या मुलीला हातावर फटके मारले. जवळपास 40 फटके मारल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी केला आहे. फटके इतके जबर होते की मुलीचा संपूर्ण हात सुजला आहे.  

नक्की वाचा - Shocking news: 'आम्हाला भांडी घासावी लागली' पाकिस्तानी खेळाडूंची लाज निघाली, कॅप्टननेच केला गंभीर आरोप

घरी आल्यानंतर मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितली. त्यावेळी मुलीचा हात सुजला होता. शिवाय लाल चट्टे ही पडले होते. तिचा हात भयंकर दुखत होता. त्यानंतर मुलीचे कुटुंबिय संबंधीत क्लासच्या शिक्षिकेकडे गेले. त्यांनी याचा जाब त्यांना विचारला. इतक्या अमानुष पणे का मारलं अशी विचारणा केली. त्यावर तुमची मुलगी अभ्यास करत नाही. इतर मुलांना देखील मी असेच फटके दिले आहेत. जर मारण्याचा त्रास होत असेल तर तुमच्या मुलीला दुसऱ्या क्लासला टाका असे उत्तर या शिक्षिकेने दिले. 

नक्की वाचा - Akola News: तरुणींना रस्त्यावर फिरणं झालं कठीण, 'त्या' घटनेचा अखेर छडा, 200 सीसीटीव्हीमुळे गेम फिरला

शिक्षिकेने एक तर मुलीला मारले. त्यानंतर अरेरावीची भाषा ही केली. त्यामुळे संबंधीत मुलीचे पालक संतापले होते. त्यांनी तातडीने रबाळे पोलीस स्टेशन गाठले. झालेली घटना त्यांनी पोलीसांना सांगितली. शिवाय त्या शिक्षिके विरोधात तक्रार ही दाखल केली आहे. त्यामुळे पोलीस आता त्यांच्या विरोधात काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आधी ही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मारण्याच्या घटना समोर आल्या होत्या. अभ्यास येत नाही म्हणून अशा पद्धतीने मारणे किती योग्य आहे याची चर्चा या निमित्ताने आता पुन्हा एकदा होताना दिसत आहे.  

Advertisement