Naxal News : राज्यातून नक्षलवादाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. गेल्य अनेक वर्षांपासून सरकार नक्षलवादांच्या हालचालीकडे बारीक लक्ष ठेऊन आहे. दरम्यान नक्षलवाद्यांकडूनही सरकारला प्रत्युत्तर देण्यासाठी प्लान आखला जात असल्याचं समोर आलं आहे. नुकतीच अटक झालेल्या माओवाद्यांकडून यासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
नक्षलवाद्यांचं नेतृत्व आता तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातील देवजी उर्फ संजीव उर्फ पल्लव करणार आहे. नंबाला केशव उर्फ बसवराजुच्या एन्काऊंटरनंतर नक्षलवाद्यांचा सर्वोच्च सरचिटणीस (जनरल सेक्रेटरी) पद रिक्त होतं. नक्षलवाद्यांच्या कोर टीमने सरचिटणीस देवजीची नेमणूक केल्याची माहिती आहे. तर पोलिसांविरोधातल्या लढ्यात अत्यंत महत्त्वाच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या पदाची जबाबदारी छत्तीसगडमधील भूमिपुत्र हिडमाकडे सोपवण्यात आली आहे.
विशेष म्हणजे नक्षलवाद्यांकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार छत्तीसगडमध्ये नुकतंच एका नक्षल कमांडरने आत्मसमर्पण केलं असून त्याच्या चौकशीत सुरक्षा दल आणि छत्तीसगड पोलिसांना सरचिटणीस पदी देवजी तर दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या सचिव पदी हिडमा याची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे.
नक्की वाचा - Raj Thackeray MNS: 'अर्बन नक्षल ठरवून अटक कराच..', राज ठाकरेंचे सरकारला थेट आव्हान
कोण आहे हा देवजी?
* तिप्पिरी तिरुपती उर्फ देवजी उर्फ संजीव हा 62 वर्षांचा असून गेले साडे तीन दशक नक्षलवादाशी जोडलेला आहे.
* तेलंगणा मधील कोरुटला, जिल्हा करीमनगर येथील दलित कुटुंबातील देवजी अत्यंत जहाल नक्षलवादी कमांडर राहिला आहे...
* देवजीवर विविध राज्याचे सहा कोटी रुपयांचा बक्षीस असून देवजी आतापर्यंत नक्षलवाद्यांच्या सेंट्रल मिल्ट्री कमांडचा प्रमुख होता..
* गुरिला पद्धतीने जंगलात सुरक्षा दलांवर त्यांच्यावर हल्ले घडवण्यात त्याला तरबेज मानले जाते.
* राणी बोदलीच्या घटनेत 55 तर दंतेवाडाच्या 80 सीआरपीएफ जवानांना देवजीच्या नेतृत्वात झालेल्या हल्ल्यात ठार करण्यात आले होते.
कोण आहे माडवी हिडमा?
* माडवी हिडमा अत्यंत क्रूर नक्षल कमांडर असून तो छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील पुवर्ती गावाचा स्थानिक रहिवाशी आहे.