छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात शनिवारी मोठी चकमक झडली आहे. विजापूरच्या तोडका भागात सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत. अजूनही चकमक सुरूच असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्तीसगडमधील ही गेल्या काही दिवसातील मोठी कारवाई आहे. या कारवाईत आतापर्यंत 8 नक्षली ठार झाले आहेत. त्यांचा हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तोडका परिसर हा विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. जिथे ही चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शिवाय आठ नक्षलवाद्यांचे मृतदेही जवानांनी ताब्यात घेतले आहेत. या हल्लावेळी नक्षलवाद्यांनी अधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने जवानांवर हल्ला केला होती. ही शस्त्रेही आता ताब्यात घेण्यात आली आहेत.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
ही चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही महिन्यातील ही जवानांची नक्षलवाद्यां विरोधातील मोठी कारवाई आहे. छत्तीसगडमध्ये नक्षली कारवायाही वाढल्या होत्या. त्यानंतर जवानांनी त्यांना पायबंद घालण्यात यश मिळवलं होतं. काही नक्षलींनी गेल्या काही दिवसात आत्मसमर्पण ही केलं आहे. ज्यांनी केले नाही त्यांना जवानांनी यमसदनी धाडलं आहे. दरम्यान या कारवाईत आणखी नक्षली ठार झाले असावेत असा अंदाज आहे.